शेळगावातील विविध महिला बचत गटांनी केली म.गांधी, शास्त्री यांची जयंती साजरी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती युवा नेते संजय पाटील चोंडे यांच्या अध्यक्षतेखाली यमुनाबाई महिला बचत गट, धुरपत माता महिला बचत गट, संत बाळूमामा महिला बचत गट यांच्यावतीने नुकतीच साजरी करण्यात आली.

प्रारंभी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसानचे प्रणेते तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाटील चोंडे, सरपंच जळबा वाघमारे, उपसरपंच आशाताई बालाजी सालेगाये, बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्षा रेखा बनसोडे, चेअरमन माधव शहापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड, सेवानिवृत्त सैनिक गंगाधर शहापुरे, जणमित्र विक्रम भालेराव, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बच्चेवार मॅडम, अशोक कुंभार, भास्कर पा.आणेराये, राजाराम ऐंजपवाड, व्यंकट निलावार यांनी करून अभिवादन केले.
उपस्थित महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार व कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कामाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रेखा बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. तर संजय पाटील चोंडे व विजय आणेराये यांनीही आपले विचार मांडले. यावेळी दत्ता निलावार, गजानन चोंडे, गंगाधर कुंभार मिस्त्री, मालिकार्जुन कुंभार, यमुनाबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा गंगाबाई मारुती निलावार, सचिव रुक्मिणी शंकर निलावार, धुरपत माता महिला बचत गटाच्या अध्यक्षा चंद्रभागा व्यंकटी निलावार, सचिव सौ. गिरजा यशवंत कोकणे, संत बाळूमामा महिला बचत गट अध्यक्षा गंगाबाई संभाजी निलावार, सचिव लक्ष्मी गंगाधर वजीरगे यासह शांताबाई बालाजी निलावार, ईराबाई निवृत्ती बैलकवाड, जोत्सना नामदेव निलावार, आराधना व्‍यंकटी शहापुरे,सौ. कलावती मारुती शहापुरे, द्वारका माधव कुंभार, रूक्‍मीनबाई किशन आणेराये, कोमल साहेबराव आणेराये, पुष्पा रामकिशन चोंडे, अंजनाबाई राजाराम ऐंजपवाड, शांताबाई भगवान डोंमलवाड, महानंदा धोंडीबा निलावार, सुरेखा गजानन चोंडे, अहिल्याबाई नागोराव बैलकवाड यासह अनेक महिलां व गावकऱ्यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय पा.आणेराये यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या