ढोल ताशाच्या गजरात पालखीच्या गणेशाची स्थापना

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुका शहरांमध्ये गणरायाचे भव्य दिव्य ढोल ताशाच्या घरात गणपती बाप्पा मोरयाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आल्या तर तालुक्यात नायगाव , कुंटूर, रामतीर्थ पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण १०० गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली.
नायगाव येथे सार्वजनिक गणेश मंडळ मानाचा पालखीचा नवसाला पावणारा ८० वर्षापूर्वी कै बळवंतराव चव्हाण, कै विठ्ठलराव कल्याण, कै नागोराव बोमनाळे, कै गोविंदराव गंजेवार, यांच्यासह लोकप्रतिनिधी , व्यापाऱ्यांनी बसवलेला गणेशाची स्थापना आज त्यांचे वारस, व मित्र मंडळाच्या वतीने गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मार्केट कमिटीच्या कार्यालयाच्या शेजारी दालनात लोकप्रतिनिधी ,व्यापारी, पत्रकार यांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. 
यावेळी नायगाव नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण,युवा नेते प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय आप्पा बेळगे, बाबुराव लंगडापुरे, भगवानराव लंगडापुरे, संजय चव्हाण, पांडू पाटील चव्हाण ,शिवाजी पाटील कल्याण, विठ्ठल बेळगे, पंढरी भालेराव, माणिक चव्हाण, नारायण पाटील जाधव,प्रा जीवन चव्हाण, शंकर पाटील कल्याण, संगमनाथ सावकार कवटीकवार, चंद्रकांत सावकार कवटीकवार, दत्तात्रय सा लोकमानवार, नरहरी सा आरगुलवार, वसंत कवटीकवार, एल टी मामीडवार, श्रीनिवास जवाद्वार मनोज गंजेवार ,विनोद गंजेवार, महेश पत्तेवार, गजानन चौधरी ,गणेश पाळेकर, यांच्या सह असंख्य, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व्यापारी मित्र मंडळाच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली तर रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे, यांच्या हद्दीत ४३ , नायगाव पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, यांच्या हद्दीत२५ कुंटूर सहाय्यक पोलीस निरीक्षक बहात्तरे यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३२, करण्यात आली असून पोलीस प्रशासनाच्या वतीने तिन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शांतता समितीची बैठक घेण्यात आली व गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ते बंदोबस्त करण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या