नायगावच्या पालखीच्या गणपतीची माजी आमदार वसंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते स्थापना !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या प्रसिद्ध मानाचा पालखीचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या अशा गणपतीची स्थापना 75 वर्षांपूर्वी कै माजी आमदार बळंतराव पा. चव्हाण, व्यापारी कै नागोराव पा बोमनाळे, कै गोविंदराव गंजेवार, कै विठ्ठलराव बेळगे, कै बापूराव पा कल्याण आदींनी मिळून मानाचा गणपती सार्वजनिक गणेश मंडळाचे स्थापना केली होती. 
या गणपतीचे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर व्यापारी लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत वाजत गाजत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिल्डिंगमध्ये स्थापना करण्यात आली.
यावेळी हनमंतराव पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, संगमनाथ सा कवटीकवार, बाबू सा अरगुलवार, उत्तम सा वट्टमवार,दत्तू सा लोकमनवार, चंद्रकांत सा कवटीकवार, विठ्ठल सा लाभशेटवार, भगवान पा लंगडापुरे, नारायण जाधव, सतीश मेडेवार, पांडू.पा चव्हाण, जगदीश प्रतापतवार, महेश पत्तेवार, सूर्यकांत कवटीकवार, गणेश पाळेकर, संजय पा चव्हाण, माणिक पा चव्हाण, कैलास कवटीकवार, प्रा.जिवण पा. चव्हाण विठ्ठल बेळगे, शिवाजी पा.कल्याण, शंकर बेळगे , व्यापारी लोकप्रतिनिधी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानाच्या पालखीच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दररोज पूजाअर्चा विधिवत करण्यात येते तर या गणेशाच्या आरती दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळ आठ वाजता महाआरती करण्यात येते आरती सहभागी होण्यासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात चढावोड होत असते.
यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात या गणपतीचे वैशिष्ट्य नवसाला पावणारा गणपती असे भाविकांमध्ये श्रद्धा आहे. म्हणून भाविक देणगी रूपात सोन्या चांदीचे व इतर साहित्य गणपती बाप्पास अर्पण करीत असतात दरवर्षी अनंत चतुर्थी गणेश विसर्जन दिवशी या गणपतीचे मिरवणूक निघाल्यानंतरच नायगाव शहरातील इतर सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणूक निघत असतात गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसाद भंडारा केला जातो यावेळी तालुक्यातील आसपासच्या खेड्यातून भावी मोठ्या संख्येने गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात व महाप्रसादाचा लाभ घेत असतात. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या