नायगावच्या पालखीच्या गणपतीचे थाटात विसर्जन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
73 वर्षाची परंपरा असलेल्या कै बळवंतराव चव्हाण ,कै विठ्ठलराव पाटील कल्याण कै, गोविंदराव गंजेवार, कै नागोराव बोमनाळे, कै विठ्ठलराव बेळगे, यांच्या संकल्पनेतून बहात्तर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सार्वजनिक मानाचा पालखीचा नवसाला पावना गणपतीची स्थापना लोकप्रतिनिधी, व्यापारी, गावकरी, यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती.

तीच परंपरा त्यांच्या वारसासह लोकप्रतिनिधी व्यापारी गावकरी चालवीतआहेत. सार्वजनिक गणेश मंडळ मानाचा पालखीचा नवसाला पावणाऱ्या मार्केट यार्ड मध्ये बसलेल्या गणरायाचे अनंत चतुर्दशी निमित्ताने गणेशाची महाआरती माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर मानाच्या गणपतीचा प्रसाद स्वरूपात नारळाची बोली लावण्यात आली.
या बोलीत गणेश पाळेकर यांनी हा प्रसाद स्वरूपात नारळ पस्तीस हजार रुपये मध्ये घेतला. त्यानंतर पालखीच्या मानाच्या गणपतीची सजवलेल्या पालखीतून भव्य दिव्य ढोल ताशा टाळ मृदंगाच्या गजरात आतिशबाजीत भगव्या पताका घेऊन मिरवणूक नायगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून जुन्या गावातील हनुमान मंदिरापासून निघाली यावेळी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, केशवराव पाटील चव्हाण हनमंतराव पाटील चव्हाण व उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, वसंतराव मेडेवार, चंद्रकांत कवटीकवार, भगवानराव लंगडापुरे , बाबू सावकार आरगुलवार, उत्तम सावकार वट्टमवार, देविदासराव बोंमनाळे, संगमनाथ सावकार कवटिककवार, बालाजी बच्चेवार,,सतीश मेडेवार , सतीश लोकमानवार , श्रीनिवास जवादवार, प्राचार्य जीवन चव्हाण, नरहरी सावकार आरगुलवार, गजानन चौधरी, साईनाथ मेडेवार, शंकर लाब्दे, पांडू पाटील चव्हाण ,संजय पाटील चव्हाण, विनोद गंदेवार, मनोज गंदेवार, गजानन फुलारी, शंकर बेळगे, प्रल्हाद पाटील बोमनाळे, नायगाव तालुक्यातील नायगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, रामतीर्थ पोलीस स्टेशन सह पो नी संकेत दिघे, कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत सह पो नी बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावांमध्ये गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पाडावा म्हणून व कुठेही अनुचित प्रकार घडू चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
www.massmaharashtra.com 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या