गणेश मंडळाच्या वतीने वृद्धांना चष्मे वाटप !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           येथील बळिराजा गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाच्या कालखंडात मोफत नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते या अनुषंगाने आज दिनांक 27 रोजी गणेश मंडळाच्या वतीने शहरातील 75 वृद्ध स्त्री पुरुषांना चष्मे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे.
या गणेश मंडळाच्या वतीने 278 लोकांची तपासणी करुन 5 नागरिकावर नेत्र शस्त्रक्रिया हि करण्यात आली, यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, सेवानिवृत्त नायब तहसीलदार नरसिंग चव्हाण,डॉ प्रशांत सब्बनवार, डॉ नरेश बोधनकर, भीम पोतनकर, विलास दिवशीकर, राम रत्नागिरे, अजिभीत सब्बनवार, कल्याण गायकवाड, अमरनाथ कांबळे, दिगंबर लांडे, नागनाथ आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद काळेवार संतोष बोधनकर, अक्षय लाडे, अनिल पेंटावार, प्रशांत पांडे, सय्याराम मुकेरवार, विजय गुप्ता, साईप्रसाद येपुरवार, सायलु पेंटावार, अशोक कुंचलीकर, लोकेश्वर भत्ते, मंगेश बोधनकर, राजू माहेवार, साई भोकरे, लक्ष्मण येपुरवार, हरीश रामदिनवार, लक्ष्मीकांत अंबेकर आदी गणेश मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करा।

ताज्या बातम्या