दिड दिवसीय गणपती बाप्पा चे विसर्जन !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील दिड दिवसीय गणेशोत्सव साजरा केला. त्या मध्ये आपल्या घरी लाल माती आनुन त्याची गणेश मुर्ती बनवून, त्याला लागणारे साहीत्य गोळा करुन, मुर्ती ला बेगड, वस्त्र, दस्ती टेपी पीस व शेतीला व परिसरातील हाराळी, आगडा, बडबडा, सातफळ फाटा,  पिवळ्या, गणेरी, डाळंबि फाटा, साग पान, व फुल,लाल गणेरी फुल फाटा,आकरा फुल पानाची पुजा करतात नैवेद्य म्हनुन मेथी, पालक, सेपु, चमकुरा, पता गोबी, फुल गोबी , वगे, मीरची, कदु, भेडी, करला, आंबाडा, अशा आकरा भाजी , पाल्याची भाजी नैवेद्य, दुधेली च्या पानावर च्या पत्रावर जेवन मांडतात.
त्या बरोबर मोदक असते ३१ ऑगस्ट ला आपल्या घरी बसूनच गणपती बाप्पा ची पुजा आरती करन्यात आली व १ सप्टेंबर रोजी नदीवर नेऊन विसर्जन करण्यात आले.
त्यावेळी गावातील गणेश आकाश जाधव, प्रल्हाद देवघरे, प्रल्हाद यान्नवार, रूपेश जाधव, महादाळे, माधवराव डोके, मोहोन चिंताके सुनिल रेखावार, पपु माहजन, शिवाजी रेनेवाड, शंकर आडकीने, बालाजी देवदे, अनिल जाधव, बिसमीले, शिंगणे, कदम, तोडे, असे अनेक जानांनि दिडदिवसीय गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर जय घोश करीत गणपतीचे विसर्जन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या