कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालयाचा इयत्ता 10वी चा निकाल 84.84 टक्के ; कु. कनकमवार सिद्धिका 91% गुणांसह शाळेतून सर्वप्रथम !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालयाचा इयत्ता दहावी चा निकाल 84.84% लागला असून विद्यालयाने आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखीत घवघवीत यश संपादन केले आहें.
शाळेतून सर्व प्रथम येण्याचा बहुमान कु. सिद्धिका विकास कनकमवार हिने 91%गुण प्राप्त करून मिळवला असून सर्व द्वितीय कु यशोदा गंगाधर अर्जापुरे 90.20% तर तृतीय कु. स्नेहा जळबा तेलंगे हिस 87.60%गुण प्राप्त झाले.
 विशेष प्रविण्यासाह 17, प्रथम श्रेणित 9 तर द्वितीय श्रेणित 2 असा निकाल लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार मुख्याध्यापक कल्याण गायकवाड जेष्ठ अध्यापक रविकांत शिंदे, माधव शिवपनोर सौ. वर्षा येणगे,सौ मेघा सब्बनवार, साईनाथ बाबळीकर, दत्तात्रय अर्धापुरे, आकाश अर्जुने, आनंद कवडेकर, प्रा गोविंदलवार श्रीनिवास, प्रा. शंकर पवार, प्रा डॉ. महेश कोंडावार, श्याम पवार यांनी स्वागत व कौतुक केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या