मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणारे राजकारणी : कै. गंगाधरराव सब्बनवार

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
काही माणसं मुलुखा वेगळी असतात नाही का…? जीवन व्यतीत करत असताना सतत काहीतरी करायची उर्मी, धडपडण्याची वृत्ती ही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कुंडलवाडी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातीलअसेच एक व्यक्तिमत्व कै. गंगाधराव सब्बनवार..!
कै. गंगाधराव सब्बनवारांचा जन्म सधन व्यापारी कुटुंबातला. वडील कै. पोतन्नासेठ सब्बनवार व आई कै. गंगाबाई यांच्या पोटी २१ ऑक्टोबर १९५१ ला झाला. कै. गंगाधराव यांच्याकडे संघटन कौशल्य दांडग होतं. अगदी किशोरवयीन अवस्थेतच त्यांनी शेकडो मित्रमंडळी जमवली, त्यात माजी नगराध्यक्ष भुमन्ना ठक्कुरवार, खाजामिया मगदूम सहाब, प्राचार्य राम जाधव, मोहन गंगोणे, शेख बाशिद, राजू संगमकर, अहमद रहमान पट्टेदार, डी. पी. नरवाड, के. छत्रप्पा, दत्तराम माहेवार, सुधाकर कन्ने, बाबाराव पाटील साखरे, गंगाधरराव भिंगे, सय्याराम हामंद,पेंटाजी इडपवार, चंद्रकांत बोधनकर, नागनाथ शिंदे, अशी सर्व जातीची किती तरी नावे सांगता येतील. नेहमी मित्राच्या गराड्यात राहणाऱ्या कै. गंगाधराव तरुण अवस्थेत श्री विद्यार्थी गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बनले. अनेक वर्ष गणेश उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य करीत असताना त्यांच्याकडे राजकारणातील नामी संधी चालून आली. मसाठवाड्याचे भाग्यविधाते कै, शंकररावजी चव्हाण यांच्या काळात कै. गंगाधरराव हे राष्ट्रीय काँग्रस पक्षाचे कुंडलवाडी शहराचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्याकडे असलेल्या नेतृत्व गुणांमुळे काँग्रेस पक्षातर्फे नगरपरिषद निवडणूक लढवून नगरसेवक झाले. पालिका उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली, त्यांच्या सहचारीनी श्रीमती कुसुमताई सब्बनवार, वहिनी श्रीमती इंदुबाई पोशट्टी सब्बनवार यांनी सुद्धा राजकीय संधी हस्तगत केली. कुंडलवाडी शहरात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक राजकीय वातावरण उत्तम होते, पण शैक्षणिक क्षेत्रात कुठेतरी कमतरता जाणवत होती, विशेषतः कुंडलवाडी हे तात्कालीन तेलंगणाच्या सीमेवर बसलेलं व आंध्र प्रदेशची छाप असलेले महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील शेवटचं गाव. या भागात अजूनही मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात नवहते, लहान वयातच मुलीचे लग्न लावून मोकळे होणारे माता – पिता पुढे त्या कोवळया मुलीवर पडलेले संसाराच ओझ ह्या समस्या या बाबींचा विचार करून कै. गंगाधररावा यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काहीतरी करावं असा ध्यास मनी धरून आपल्या आईच्या नावाने कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार बालक मंदिर उभे केले. पुढे याच बालक मंदिराचे प्राथमिक शाळेत रूपांतर झाले. दिनांक २२/०८/ १९८० साली श्री मार्कडेय एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुलींच्या शाळेचा आरंभ केला. आज या शैक्षणिक दालनाचं मोठं वटवृक्षात रूपांतर झालं. श्री मार्कडेय एज्युकेशन सोसायटीच्या एक बालक मंदिर ते सातवी प्राथमिक शाळा व पाचवी ते बारावी मुलींचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय असा दोन शाखा ह्या गुणवत्तापूर्वक चालतात. गेल्या ३५ वर्षात हजारो गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे काम या शिक्षण संस्थेने केले, अर्थातच कै. गंगाधररावांचे राजकारण, समाजकारणा पेक्षा शिक्षण संस्थेकडे अधिकाधिक लक्ष राहिल्यामुळे हाती घेऊ ते तडीस नेऊ या उक्तीप्रमाणे त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरते. ते अर्जापूर येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक, कोषाध्यक्ष पदावर असताना त्यांचे सहकारी कै. बापूराव बिलोलीकर, माजी आमदार गंगाधरराव पटणे, कै.मनोहरराव देशपांडे, पंढरीसेठ चाचार, कै. लक्ष्मणराव पाटील अर्जुन, राजुसेठ उत्तरवार, नागनाथराव पाटील सावळीकर, सुभाष गायकवाड, सुनील बेजगमवार आदीसोबत काम केले. बाजार समिती कुंडलवाड़ी संचालक पदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष पदी ही त्यांनी काम पाहिले. त्यांचे एक वैशिष्ट्य पद असो वा नसो सत्तेत असतो का नसो त्यांचा सतत जनमानसात वावर असायचा. नेहमीच त्यांच्या अवतीभवती माणसे असायची.सामाजिक व राजकीय कार्य करीत त्यांनी संजय गांधी निराधार योजना,पात्र लाभार्थ्यांना मिळवून दिली,विडी कामगारांना कायमचा रोजगार मिळवून दिला.सधन कुटुंबात जन्मलेले वाढलेले तरी सर्वसामान्य लोकांची, मित्रपरिवाचे नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. किल्लारी भूकंपाच्या वेळेस आपल्या संस्थेच्या शिक्षक कर्मचार्याना तीन दिवस लातूर जिल्ह्यातील किल्लारी,सास्तूर गावातील भूकंपग्रस्तांना मदत करण्याचे त्यांचे कार्य उद्देखनीय आहे. याशिवाय वेळोवेळी पूरग्रस्त, कारगिल युद्धातील शहीद जवानरांच्या कुटुंबियांसाठी शालेय विद्याथ्यांची मदतफेरी काडून, निधी जमवून, शासनाकडे पाठयामाचे मोलाचं कार्य त्यांनी केलं. शाळेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना बोलून, विद्यार्थ्यांना बौद्धिक व्याख्याने देण्याचं काम अविरतपणे त्यांनी चालावलं. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री भास्करराव खतगावकर, मा.खा.प्रताप चिखलीकर,कै. रावसाहेब अंतापुरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत,आ.कैलास गोरंट्याल,आ.विक्रम काळे ,आ.सतीष चव्हाण, मा.आ.वसंतराव चव्हाण अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ, प्रा. भगवान अंजनीकर, डॉ. वृषाली किन्हाळकर, प्रा. कल्पना जाधव, माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील, डॉ. शेषराव मोरे, माजी आमदार गंगाधरराव पटणे, प्राचार्य डॉ. तसनिम पटेल, प्रा. अमृत देशमुख, सगरोळीचे कै. देशमुख, भगवानराव भिलवडे, शंकरराव रोशनगावकर, प्राचार्य बालाजी कोम्पलवार, डॉ. ललिता अलसटवार, डॉ. बालाजी चिरडे, निळकंठ कदम अशी दिग्गज मंडळी शालेय माध्यमातून बोलावली, त्यांचे मोलाचे मार्गदर्शन शिक्षक आणि विद्यार्थ्याना घडवलं. दहावी, बारावीचा निकाल लागताच गुणवंत विद्याथ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात त्यांना खूप आनंद समाधान वाटायचे, शालेय विद्यार्थी, लहान मुलांसोबत ते लहान होऊन रमत.
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे मोठे चिरंजीव राजेश सब्बनवार, संस्थेचे विद्यमान सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार, इंजि. अभिजीत सब्बनवार, ॲड. रंजिता सब्बनवार (अनमल) हे मार्गक्रमण करीत आहेत. संस्था मोठी आहे, माणूस मोठा नाही ही विचारधारा घेऊन चालणारे सब्बनवार कुटुंबीय कै. गंगाधररावांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे घेवून जाण्याचा मानस अंगीकारून मार्गक्रम करतीत करीत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करून लेखन प्रपंच धांबवतो.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या