गंगनबीड देवस्थान येथील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या शिवपार्वती एकत्र शिंगणापूर महादेव प्रतिरूप समजले जाणाऱ्या महादेव मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
मंदिर प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्ष मुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागल्याने भाविकात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नांदेड ते नरसी महामार्गावर असलेल्या कुंटूर फाट्यापासून पश्चिम दिशेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य वातावरणात पहाडावर वसलेल्या शिवपार्वती एकत्र शिंगणापूर महादेव प्रतिरूप समजले जाणाऱ्या पुरातन कालीन महादेवाच्या दर्शनासाठी, चौथ्या सोमवारी भाविकांनी पहिल्या रात्रीच्या बारा वाजल्यानंतर मराठवाड्यातील विविध भागातून आसपासच्या खेड्यातून गोदावरीचे पाणी घेऊन कावड घेऊन अभिषेक व दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, बाल गोपाळ, यांनी दर्शन घेतले.
वजीरगाव येथील गोदावरीचे पाण्याची कावड घेऊन अभिषेक करण्यासाठी आलेल्या भाविकांना गंगनबीड महादेव येथील पुजाऱ्यानी मंदिरात येण्यासाठी मज्जाव केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
भाविकांच्या मध्यस्थीने अखेर कावड घेऊन आलेला भाविकांना अभिषेक करण्यासाठी सोडण्यात आले. परंतु यावेळी मंदिर प्रशासनातील विश्वस्तांना यावर चर्चा केली असता पुजाऱ्याची मनमानी वाढल्यामुळे भाविकात नाराजी वाढत आहे. आम्ही काही करू शकत नाही असे मत व्यक्त केले.
अभिषेकासाठी आलेल्या भाविकांना मंदिर प्रशासनाकडून पावती स्वरूपात देणगी घेऊन वेगळे व्यवस्थापन न केल्यामुळे, एकाच वेळी धर्म दर्शनासाठी आलेल्या लोकांना व अभिषेकासाठी आलेल्या भाविकांना एकाच लाईन मध्ये सोडल्यामुळे मंदिर प्रशासनाला उत्पन्न वाढेल आणि धर्मदर्शनासाठी आलेल्या लोकांना अडथळा निर्माण होणार नाही अशी खंत भाविकातून व्यक्त होत आहे.
तीर्थक्षेत्राचा दर्जा होऊनही शासनाच्या वतीने कोट्यावधीचा निधी येऊनही बोगस कामे झाल्यामुळे, पहाडावर चढणाऱ्या वाहनावरून जाणाऱ्या भाविकांना खड्ड्यामुळे जीवितास धोका निर्माण होत आहे. प्रशासनाचे लोकप्रतिनिधीचे विश्वस्तांचे दुर्लक्ष झाल्यामुळे भाविका तीव्र नाराजी होत आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy