मौजे गंजगाव येथे अर्थिक व डिजीटल साक्षरता जागृती मेळावा संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव मध्ये रिजर्व बँक आॕफ इंडिया प्रकल्पा अंतर्गत बँक आॕफ महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामीण बँक संचलीत क्रिसिल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र मौजे गंजगाव येथे 10 मे 2023 रोजी संपन्न झाले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी हानमंतराव कनशेटे यांनी शाखाधिकारी केरुरे साहेबाच सत्कार करण्यात आला.  बसवंत बावलगावे उपसरपंच प्रतिनिधी यांनी प्रभाकर शिंदे सरांचा सत्कार केला तर मारोती घाटे यांनी वाघमारे यांचा सत्कार केला.
सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर पुढे बोलताना शाखाधिकारी केरुरे सर असे म्हणाले की सर्व बँकेतील खातेदाराने बँकेच्या सर्व योजनाचा फायदा घ्यावा. अटल पेन्शन योजना प्रधानमंञी जिवन ज्योती योजना, प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना या सर्व योजना शासनाच्या असुन एखादी व्यक्तीचे अचानक पणे निधन झाले तर या योजनेतुन दोन लाख रुपये मिळतात. उदाहरण पाहायच म्हणजे तुमच्या गावातील महिला वारसदाराला वैभव घाटे च्या माध्यमातून दोन लाख रु धनादेश देण्यात आला.
यावेळी बँक मिञ वैभव घाटेने सुञसंचालन केले तर आभार प्रभाकर शिंदे यानी मानले. या कार्यक्रमाला सुहास देवकरे, अंगणवाडी ताई अरुणा मठपती, चंद्रकला घाटे, रेखा स्वामी, बचत गटातील सिआरपी शिवकांता वनरवाड, लिपीका सुनिता डूबकवाड, अनवर पठान, शालेय शिक्षण समितीचे आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते. प्रभाकर शिंदे, मनीवाईज सेंटर मॕनेजर, दर्शन वाघमारे, समन्वयक, गावातील तरुण वर्ग खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या