मौजे गंजगाव येथिल गट क्रमांक 81, 82, 83 मधील रेती घाटाचे ईटीएस मशिनद्वारे मोजणी करुन रेतीघाट बंद करण्याची मागणी !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील गंजगाव येथिल खाजगी रेती घाटाचा ठेकेदार याना रेतीघाटाची परवानगी देण्यात आलेली होती. परंतु रेती उत्खननाची परवानगी देण्यात आलेल्या गटा मध्ये वास्तविक पाहाता रेतीचा साठा उपलब्ध नाही, म्हणून रेती ठेकेदार महसुल प्रशासनाला हाताशी धरुन रेती उत्खननाची परवानगी दिली एका गटाची उत्खनन करतो दुसऱ्या गटात अशी वास्तविक चिञ गंजगाव मांजरा नदीत पाहावयास मिळतो मांजरा नदी पाञातुन रेतीचे ठेकेदार दररोज दिवस राञ चार ते पाच जेसिबी यंञाच्या साह्याने अमाप उत्खनन करुन फार मोठ्या प्रमाणात वाळुची तस्करी करुन महाराष्ट्र कर्नाटक तेंलगणा आदि राज्या मध्ये रेतीची विक्री केली जाते मांजरा नदी पाञात दहा ते पंधरा फुटापर्यत खड्डे पडलेले आहे.

रेती ठेकेदारा कडुन शासनाच्या लाखो रुपये संपत्तीचे लुट सर्रासपणे चालुच आसुन सदर प्रकरणात तालुका महसुल प्रशासन गप्प आहे. तलाठी,  मंडलाधिकारी, संबंधित महसुल नायब तहसिलदार कानाडोळा करित शासनाची तिजोरी जोपासणारे महसुल अधिकारी, रेती ठेकेदाराना रानमोकळे करुन देत आहेत. यात काही शंका नाही.

प्रशासनाच्या बेजबाबदार पणा मुळे रेती ठेकेदाराला रेतीचे उत्खनन करण्यासाठी एका गटाची परवानगी दिली असताना रेती ठेकेदार प्रशासन आपल्या खिशात आसल्या सारखे वागत आहे. रेतीचे अवैध उत्खनन चालु आसल्यामुळे शासकिय यंञणेचे पथक नावालाच असल्याने असा प्रकार होताना दिसुन येत असताना सुध्दा रेतीघाटावर रेतीचे तुफान उत्खनन चालु आहे. हे महसुल प्रशासनाला दिसत नाही आहे का? ईटीएस इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन द्वारे रेतीघाटाची मोजणी करुन रेतीघाट सिल करण्यात यावे अशी मागणी माधवराव घाटे व नरसिंग ओनरवाड यांनी उपविभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या