कुंडलवाडीत गॅस गळतीमुळे घराला आग ; चार ते पाच लाखाचे नुकसान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लक्ष्मीकांत येपुरवार यांच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस गळती होऊन दिनांक 21 रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घराला आग लागली आहे.

 

त्यात संसारपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले तर घरातील साडी दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत घरातील संसारपयोगी साहित्य, नगदी रोकड, दागिने, महत्वाची कागदपत्रे, आदी साहित्यासह अंदाजे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार यांच्यासह शेजारील नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीत सुदैवाने कुठलीही जिवीतीहानी झाली नाही.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी व कुंडलवाडी सज्जाचे तलाठी बिराजदार यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला आहे. सदरील आगीत मोठे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या