श्री मल्टीसर्व्हिसेस चिखली ता कंधार येथे रमाई गॅस सर्व्हिस कंधार अंतर्गत अधिकृत रिफिल पॉइंट चा शुभारंभ.

[ चिखली प्रतिनिधी – ज्ञानेश्वर यादव ]
आज दि.26 जानेवारी 2023 रोजी मौ. चिखली ता कंधार येथे रमाई गॅस सर्व्हिस कंधार कडून अधिकृत रेफिल पॉइंट देण्यात आला.

त्यावेळी चिखली गावचे सरपंच श्री. साहेबराव पोटफोडे, सौ. ज्योतीताई कदम (सदस्या), श्री. सूर्यभान करेवाड (सदस्य), माजी सरपंच श्री हरिनाम पवळे व तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
रमाई गॅस सर्व्हिस कंधार चे मॅनेजर श्री गायकवाड साहेब यांनी गावातील महिला व नागरिकांना गॅस वापरताना घ्यावयाची खबरदारी समजाऊन सांगत कार्यक्रमाची आखणी केली.
महिलांनी स्वयंपाक करताना गॅस वापरत असताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे म्हणत मुद्देसूद माहिती समजाऊन सांगितली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या