के. रामलू शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले विविध सुप्त कलागुण ; दोन दिवसीय कला महोत्सव संपन्न !

[ कुंडलवाडी : अमरनाथ कांबळे ]
         येथील के.रामलू पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 2 व 3 मार्च रोजी दोन दिवसीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी वेगवेगळ्या गीतांवर नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

              दिनांक 2 मार्च रोजी कला महोत्सवाचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड तर कार्यक्रमाचे अध्यक्ष, म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधु गिरगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून .सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, पेट्रोलियम अधिकारी राजेंद्र रेड्डी तोटावार,पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे,प्रतिष्ठित व्यापारी दिनेश दाचावार हे उपस्थिती होते .

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष के.रामलू कोटलावार यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली .यात सत्कारमूर्ती कुंडलवाडीचे भूमिपुत्र राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कन्नड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व यांच्या सपत्नीक सूस्मिता ठक्कूरवार यांचा सर्व मान्यवरांच्या तसेच सायरेड्डी ठक्कूरवार व संचालिका रमा ठक्कूरवार आणि गजानन कोटलावार यांच्या हस्ते सत्कार करूण स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले . तर दुसऱ्या दिवशी दिनांक 3 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार ,प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष भुमन्ना ठक्कूरवार पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे हे उपस्थित होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी हिंदी, तेलगू, मराठी ,इंग्रजी गीतावर सादर केलेल्या नृत्यात कव्वाली , गोंधळ , हॉररगीत, कॉमेडी नृत्य हे प्रमुख आकर्षण ठरले. यात सांस्कृतिक विभाग प्रमुख उमाकांत कुलकर्णी , अर्चना नरोड दाक्षायणी नुग्रावार, अपूर्वा मुनगिलवार यांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रथम दिवसाचे सूत्रसंचालन येमेकर नागनाथ आणि विजय दावलबाजे तर दुसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन संतोष भाले आणि राजेश कागळे यांनी केले . तर आभार प्रदर्शन शाळेचे संस्थाध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहभागी सर्व विद्यार्थी शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .याबद्दल या सर्वांचे शाळेचे संस्थाअध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार सचिव यशवंत संगमवार संचालिका रमा ठक्कूरवार मु.अ.टी.नरसिंगराव यांनी अभिनंदन व कौतुक केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या