के रामलू शाळेच्या कला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ; कुंडलवाडीत दोन दिवसीय कला महोत्सवाचे आयोजन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        येथील कुडलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के रामलू पब्लिक स्कूल कुंडलवाडीच्या वतीने दिनांक 16 व 17 फेब्रुवारी रोजी दोन दिवशीय शालेय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात पहिल्या दिवशीच शहर व परिसरातील पालक व रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देत लहान बालकांच्या कलागुणांना दाद देत त्यांचे कौतुक केले आहे.

              के रामलू पब्लिक स्कूल कुंडलवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय शालेय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

पहिल्या दिवशी प्राथमिक वर्गाच्या मुला मुलीनी देशभक्ती, तेलगू,हिंदी, मराठी,अध्यात्मिक अशा विविध गीतावर नृत्य सादर करून समाजातील विविध ज्वलंत प्रश्नावर नाटिका सादर करून उपस्थित प्रेक्षक वर्गांचे मने जिंकली आहेत.

              सदरील कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मधुकरराव उन्हाळे राज्यकार्य महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद,प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील सावळीकर, यु एस राठोड, तोटावार, विभूती मॅडम,आदी उपस्थित होते.तसेच दिनांक 17 रोजी सायंकाळी 6 वाजता माध्यमिक वर्गाच्या मुला मुलींचा बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला सर्व शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या