शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची जिंकली मने !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         येथील डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या शाहू महाराज प्राथमिक विद्यालय या शाळेत एक दिवशीय शालेय कला महोत्सव दिनांक 3 रोजी आयोजित करण्यात आला होता,शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

         कुंडलवाडी येथील शाहू महाराज प्राथमिक विद्यालय या शाळेच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यां मधील सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने,एक दिवशीय कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता,या कला महोत्सवात विद्यार्थ्यांनी हिंदी,मराठी, लावणी,लोकगीत, रिमिक्स, देशभक्ती,आदी गीतावर बहारदार नृत्य सादर करुन,सामाजिक संदेश देणाऱ्या हुंडाबंदी, प्लास्टिक बंदी, आदी विषयावर नाटिका सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

          यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, उद्घाटक पानसरे महाविद्यालयाचे माजी सचिव पंढरीनाथ दाचावार,प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे व्हाईस चेअरमन संतोष पाटील शिवशेट्टे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका संघचालक विश्वनाथ दाचावार, माजी नगरसेवक अशोक कांबळे, डॉ नरेश बोधनकर आदी उपस्थित होते.

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता सोलापूरे, सहशिक्षक धोंडिबा बगाडे, ब शंकर गायकवाड, कैलास जवादवार, बालाजी वडजे, कृष्णा मोरे,राधिका शिंदे,आदींनी परिश्रम घेतले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी वडजे तर आभार शंकर गायकवाड यांनी मानले आहे. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिकासह मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता..
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या