शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिंकली रसिकांची मने

“शाळेनी दिले विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद” !!

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
          येथील शाहू महाराज प्राथमिक विद्यालय या शाळेचा संस्कृतिक कार्यक्रम दिनांक 27 रोजी कुंडलेश्र्वर मंदिरा समोरील प्रांगणात पार पडला,या कार्यक्रमात बाळ कलाकारांनी विविध गीतावर नृत्य व नाटिका सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

              कुंडलवाडी येथील डॉ हेडगेवार शिक्षण संस्था संचलित असलेल्या शाहू महाराज प्राथमिक विद्यालय या शाळेने दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेच्या बाल कलाकारांनी मराठी, हिंदी, तेलगू, देश भक्तीपर गीते आदी गीतावर नृत्य सादर करून सामाजिक संदेश देणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्या, दारू बंदी, स्त्रीयांच्या जीवनातील विविध रूपे आदी विषयावरील नाटिकेवर नेत्रदिपक अभिनय करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बाल कलाकाराना कौतुकाची थाप दिली आहे.

               यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, विश्वनाथ अण्णा दाचावार, अशोक कांबळे, डॉ प्रशांत सब्बनवार, संतोष शिवशेट्टे, दिनेश दाचावार, चंद्रकांत बोधनकर, कल्याण गायकवाड, अमरनाथ कांबळे, नागोराव लोलापोड, डॉ लीला लखमपुरे, अंजू दाचावार, सारिका सब्बनवार, भाग्यश्री बाबलीकर आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका गीता सोलापूरे, सहशिक्षक कृष्णा मोरे, बालाजी वडजे, धोंडिबा बगाडे, कैलास जवादवार, राधिका शिंदे आदींनी परिश्रम घेतले आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी वडजे यांनी केले तर आभार गीता सोलापुरे यांनी मानले आहे.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या