नायगाव येथे गायत्रीमंत्र पुरश्र्चरण अनुष्ठान सांगाता सोहळा संपन्न.

[ नायगाव प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
गायत्री मंत्र पुरश्र्चरण अनुष्ठान सांगाता सोहळा नायगाव येथील साईतीर्थ मंगल कार्यालयात नुकताच संपन्न झाला.यावेळी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
सेवानिवृत्त नायब तहसीलदार कीर्तनकार ह.भ.प वासुदेव महाराज कोलंबीकर यांनी गुरूवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच चातुर्मास पंढरपूर आळंदी येथे पुर्ण केला.या काळात गायत्री मंत्राचा पुरश्र्चरण अनुष्ठान केले.ज्याला शास्त्रामध्ये अंत्यत महत्त्व आहे.
या निमित्ताने गुरूवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता केली.२३ जून रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमास कीर्तनकार मधुसूदन महाराज कापसीकर, बालाजी महाराज गुंडेवार, सदाशिव महाराज वडगावकर, विकास भुरे, लक्ष्मण महाराज गंगाखेडकर, कृष्णा महाराज मारतळेकर, शिवराज पाटील होटाळकर, बाबुराव लंगडापुरे, लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ.दतात्रय शिंपाळे , राजेश्वर मेडेवार ,सदानंद मेडेवार,वसंत माने, शंकर लाब्दे, सतीश मेडेवार, पवन गादेवार, व्यंकटराव जाधवसर , बालाजी शिंदेसर , गोविंद शिंदेसर, शिंदे टेलर, गजानन चौधरी, मनोज आरगुलवार, विष्णू महाराज तांदळीकर, हवगी महाराज पन्नासे, रमेश खैरगावकर, नामदेव पांचाळ, गणेश हक्के, मारोतराव बेटकबिलोलीकर, विश्वेश्वर महाराज कोलंबीकर, ज्ञानेश्वर महाराज जोशी यांच्या अनेक भक्त मंडळी उपस्थित होती.
www.massmaharashtra.com