स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने सामान्य ज्ञान परीक्षा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      येथील स्वराज्य गणेश मंडळ वंजारगल्ली यांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येत असतात,त्याच अनुषंगाने शहरातील विध्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या भावनेने दिनांक 4 सप्टेंबर रोजी मिलिंद विद्यालय कुंडलवाडी येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेत शहरातील 93 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले आहेत,सदरील परीक्षेचा निकाल व पारितोषिक गणेश विसर्जनाच्या दिवशी देण्यात येणार आहे.
यावेळी साईनाथ भोरे, रामनाथ करपे, पोतना करपे, राजू माहेवार, बंटी साठे, शिवा खांडरे, लक्ष्मण नवाथे, महेश कापकर, विनोद भास्कर, बालाजी गंगोने, शिवा गंगोने निखिल करपे, देविदास भोरे, आदींसह स्वराज गणेश मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या