कुंडलवाडी सोसायटीला स्टोर कोड मिळाला ; जेनेरिक मेडिकल सुरू होण्याचा मार्ग मोकळा

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाकडून स्टोर कोड मिळाल्याने जेनेरिक मेडिकल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जनरिक मेडिकल सुरू होत असल्यामुळे नागरिकांना अल्प दरात औषधी उपलब्ध होणार आहेत.
मधुमेह,-हदविकार,रक्तदाब यासह विविध आजाराने नागरिक त्रस्त आहेत.त्यावरील ‘ब्रॅंडेड’ कंपन्यांची औषधे महाग आहेत. त्या तुलनेत जेनेरिक (जनौषधी) औषधे ३० ते ७० टक्के स्वस्त आहेत. औषध कंपन्यांची जाहिरातबाजी, कर, व्यापारी आणि केमिस्ट यांचे कमिशन, वाहतूक खर्च आदींमुळे ‘ब्रॅंडेड’ औषधी जेनेरिक औषधांपेक्षा अनेक पटीने महाग असतात. हा बोजा रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांवरच पडतो. या दुष्टचक्रातून जेनेरिक औषधे सुटका करू शकतात. काही अत्यावश्‍यक औषधे किंवा इंजेक्‍शन स्वस्त व गुणवत्तापूर्ण आहेत,नागरिकांना अल्प दरात औषधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तर्फे जेनेरिक मेडिकल सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे सर्व कागदपत्रे पाठवून सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार,व्हाईस चेअरमन गंगाधर नरावाड व सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील होते.
सोसायटीतर्फे जनरिक मेडिकल सुरू करण्यासाठी सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या बाजूला नवीन खोलींचे बांधकाम करण्यात आले. तसेच सोसायटीकडून महा-ई-सेवा केंद्र ही आगामी काळात सुरू होणार आहे. दि.७ जानेवारी रोजी दिल्ली येथील एका कार्यक्रमात सोसायटीचे व्हॉइस चेअरमन गंगाधर नरावाड,मँनेजर राम रत्नागिरे यांना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याकडून स्टोर कोड देण्यात आला आहे. त्यामुळे सोसायटीकडून लवकरच जेनेरिक मेडिकल सुरू होणार असल्याने नागरिकांना अल्प दरात औषधी उपलब्ध होणार आहे.

◆ काय आहे जेनेरिक ओषध :-
जेनेरिक म्हणजे मूळ औषध. जेनेरिक व ब्रॅंडेड औषधांचे गुणधर्म एकच असतात. विविध कंपन्या स्वत:चे ‘ब्रॅंडनेम’ देऊन ती औषधे बाजारात आणतात. सर्वच रोगांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या