बांग्लादेशातील हिंदुचे संरक्षण व्हावे या मागणीचे नायगाव तहसीलदार यांना निवेदन !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
बांग्लादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार तात्काळ थांबवावेत. त्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन बांग्लादेश सरकारवर दबावतंत्र निर्माण करून बांग्लादेशात हिंदुवर होणारे अत्याच्यार थाबवावे अशी मागणी भारतीय हिंदू समाजाच्या वतीने नायगाव नायब तहसीलदार यारावाड यांना करण्यात आली आहे.

बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्यांकांवर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून महिलांवर होणारे हल्ले, खून, लूटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचार हे अत्यंत चिंताजनक असून भारतीय हिंदू समाज त्याचा निषेध करतो. सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा हे थांबवण्याऐवजी केवळ मूक प्रेक्षक बनले आहेत. बळजबरीने बांगलादेशातील हिंदूंच्या आत्मसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठवलेला आवाज दाबून टाकण्यासाठी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराचे नवे पर्व सुरू होत असल्याचे दिसते. अशा शांततापूर्ण आंदोलनात हिंदूंचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉन साधू चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात पाठवणे सरकारचे अन्यायकारक आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि श्री चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करावी, असे आवाहन भारतीय हिंदू समाज नायगाव तालुका बांगलादेश सरकारला करत आहे.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्याच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर भारत सरकार उचलावीत, असे आवाहनही भारतीय हिंदू समाज भारत सरकारला करतो.या नाजूक वेळी, भारत आणि जागतिक समुदाय आणि इतर संघटनांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे समर्थन व्यक्त केले पाहिजे आणि जागतिक शांतता आणि बंधुता यासाठी आपापल्या सरकारांकडून शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे. आसी मागणी सकल हिंदू समाज नायगाव तालुका करत आहे.
असे निवेदन सौ. पल्लवी बळीराम वडजे,प्रिया रमेश राव जोशी,सौ. जयश्री बालाजी नरवाडे,संतोष तळणीकर,नागेश मेटकर,माधव डाकोरे,बळीराम पाटील वडने,परमेश्वर पाटील जाधव,भगवान पाटील डांगे,गणेश कंदुरके,जळबा गवळे,बालाजी बोसलवाड,कैलास तेलंग,मनोज कदम,वैजनाथ लाडके आदिजन तहसील कार्यालय नायगाव यांना निवेदन दिले आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या