सकल हिंदू समाज तालुका नायगाव च्या वतीने बांग्लादेशात होत असलेल्या हिंदूवर होत असलेल्या अन्यायाबद्दल तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान मोदी यांना निवेदन.

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
. दि 10 डिसेंबर मंगळवार रोजी नायगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशात होत असलेल्या हिंदू अत्याचार आणि हिंदू मंदिरावर होणारे हल्ले गेल्या काही महिन्यापासून बांगलादेश व देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या मानव अधिकार मालमत्ता आणि जीवाचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास येत आहे. बांगलादेशात गेल्या काही महिन्यामध्ये हिंदू मंदिरावर झालेले हल्ले, तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबलावृद्ध आणि महिलावर झालेले अमानविय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकाराचे हानन करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजीनी आपल्या स्तरावरून तात्काळ करावी.
अशा कारवाईस आम्ही भारताचे हिंदू म्हणून आपल्या सोबत ठामपणे उभे राहण्याचे निवेदन आज नायगाव तहसीलदारा मार्फत आज सकल हिंदू  समाज तालुका नायगाव च्या वतीने कैलास, माधवराव शिंदे, नागेश मोसवंडे, माधव पाटील कल्याण, प्रवीण शिंदे, गणेश शिंदे, पुरुषोत्तम जाधव, गजानन स्वामी, वैभव देशमुख, मेघा डोगळे, संदीप मारवाडी, सचिन कुष्णुरे, गुरुनाथ चव्हाण, योगेश बामणे, देविदास तमन बोईनवाड, शिवलिंग पुटेवाड, साईनाथ वंगरवार, गणेश मामीडवार, अविनाश चव्हाण, पृथ्वीराज जाधव ,कृष्णा मनुरे, चंद्रकांत कदम, गजानन शिरडकर, संतोष कावडे, गणेश कंधारकर, विजय मुटकुलवार या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या