३३ वर्षे नंतर झाले संवगडयाचे गेटुगेदर !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर शाळेतील SSC १९९२ बॅच दहावीच्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचा ३३ वर्षे नंतर पहिले १०२ पैकी ६५ विध्यार्थी उपस्थिती स्नेह मिलन कार्यक्रम नुकताच कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूल  येथे भरघोस उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवन म्हणजे जीवनातील एक कधीही न विसरता येणारा अविस्मरणिय आठवणींचा अध्याय. मात्र दहावीच्या परीक्षेनंतर मित्र-मैत्रिणींच्या पुढील जीवन-प्रवासात वेगवेगळ्या वाटांनी गेल्याने ताटातुट झाली. मात्र आता सुमारे ३३वर्षानंतर सोशल मिडियाच्या व्हाट्सअप माध्यमातून एक ग्रुप तयार झाला आणि एकमेकांपासुन इतकी वर्षे दुरावलेली दहावीतील बालसुलभ चिमणपाखरे वयाच्या पन्नाशीकडे पोहोचत असताना दुर अंतरावरुन एकत्र आली. एक छोटेखानी गेट-टुगेदर करण्याचा बेत आकाराला आला. १९९२ चे जे शिक्षक होते श्री. बुके सर, भोसले सर, गोपाळराव कदम सर, डी आय कदम सर जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय राजपूत सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. 
कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली. उपस्थित सर्वांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. प्रत्येकाने आपले मनोगत थोडक्यात प्रकट केले. आपल्या जुन्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सध्या कोण कुठे काय करत आहे व आपले मुले काय करत आहेत याचा मागोवा घेतला गेला. 
सुत्रसंचालन मोहन शंकरराव फडेवार यांनी केले.  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बालाजी हनमंते केले . कार्यक्रमाला मार्गदर्शन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा बूके सर यांनी केले परीश्रम गोदाजी परडे परमेश्वर कदम, हनमंत परडे, रघुनाथ कौठकर, बालाजी पुयड, बालाजी शिळे, बापुराव अडकिने, गणेश जाधव, मारोती यान्नवार, यांनी मोलाचे सहकार्य लाभले .
सर्व विद्यार्थ्यीनी उपस्थित होते आर्चना गगांधरावजी देशमुख, ललित दिगांबर कदम, आनिता कीशनराव चिंताके, आनिता विठ्ठलराव यन्नावार, मनिष दतात्र्य कुलकर्ण, निर्मला केरबा कुंचमवाड, पदमिनबाई किशनराव कोठमड, मीरा रामचंद्र पवार, वनिता बाजीराव मनुरे, रंजना मधुकरराव ताटे, माधाबाई बापुराव माने, विध्यार्थी जवळपास ६५%उपस्थित होते शेख मेहबूब शेख मौलासाहब, शेख मेहबूब रशीदसाहब, श्रीपत सटवाजी डाके, विलास राजाराम शहापूर सुदर्शन शेषराव खंडेजोड भिवसेनतेजराव बेलकर, हौसाजी विठ्ठल सूर्यवंशी, सुभाष जगजीराव बेलकर, बापूराव चाडकर, लक्ष्मण किशनराव मोरे, शेख शाकीर हुसेन साहब, झुंजारे सुभाष मरीबा, शेळके मसनाजी भुजंगा, व्यंकट नागोराव कदम, संतोष गंगाधर कदम, मोहन भीमराव काळेवार, कदम प्रल्हाद कोंडीबा, शिवाजी भिवशेन अलगुलवार, सुभाष किशन सूर्यवंशी, सुधाकर बळीराम लव्हळे, शेख उस्मान अल्लाउद्दीन, अडकिने बापूराव किशनराव, बापूराव आनंदराव तोडे, बालाजी सखाराम पुयड, प्रभाकर कोंडीबा पुंडगे, बापूराव आनंदराव तोडे, शिवाजी भुजंग जाधव, गणेश विठ्ठलराव जाधव, बालाजी खतगाव, मषनाजी शेळके, ईत्यादीची उपस्थित होती. 
कार्यक्रमा संपताच जे १० विद्यार्थी व ८ शिक्षक आपल्यातुन सोडुन गेलेत त्यांना दोन मिनिटे उभे राहुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व कार्यक्रम संपताच त्याना स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. शेवटी सर्वांचे आभार मानून गोड समारोप केला. जणू आयुष्यातील उर्वरित काळासाठी आनंदी स्मृतींचे एक टॉनिक, संजिवनी बुस्टर डोस घेऊन सर्व जण दिवसभराच्या कार्यक्रमानंतर पुन्हा गेटुगेदरचा कार्यक्रम करु असे एकमेकांना वचन देऊन आपापल्या घरी परतले. या कार्यक्रमाला घडुन आननाऱ्या मुलाना शिक्षकानी शाबासकीची थाप दिली. शेवटी मोहन होळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या