कृषी व पशु प्रदर्शनाला शेतकरी व पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – वसंत सुगावे पाटील यांची माहिती.. !!
[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
घुंगराळा येथील खंडोबा यात्रेतील कृषी व पशु प्रदर्शनाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मा.सभापती शिवराज पाटील होटाळकर, भाजपा नेते राजेश कुंटुरकर, मा.जि. प. सदस्य बालाजीराव बचेवार, कुंटर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील, मा.जि. प. सदस्य सूर्याजी पा.चाडकर, रा.पा. तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडुरे, तालुका कृषी अधिकारी दीपेश देवराये, सहाय्यक आयुक्त डॉ. गौतम गजभारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे, तालुका वैदयकीय अधिकारी पटवेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिषेक देवकाते, डॉ. कपिल भालेराव, डॉ. शंकर उदगीरे, डॉ. अजय कुचरे, डॉ. साई रामोड, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले..
सदर कृषी प्रदर्शनात नायगाव तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळे, यांचे स्टॉल लावले होते तसेच सगरोळी ता. बिलोली येथील कृषी विज्ञान केंद्राचे स्टॉल लावण्यात आले होते, या मध्ये आयुर्वेदिक साबण, लोणचे, आयुर्वेदिक पावडर या वस्तू प्रदर्शनास होत्या.. तसेच कुंटुर येथील बचत गटाच्या महिलांनी घोंगडी, व घोंगडी पासून बनवलेल्या लहान मोठ्या वस्तूंचे स्टॉल लावले होते. यात भाजीपाला प्रवर्गामध्ये टमाटे, पालक, मेथी, कोथिंबीर तसेच फळांमध्ये डाळिंब, अंजीर, आदी गोष्टी प्रामुख्याने होत्या.
तर पशु प्रदर्शनामध्ये घोडा, बैलजोडी, गिर गाय, रेडा, कुत्रे, मेंढ्या, गायी, वळू आदी पशूंचे प्रदर्शन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. सरपंच वसंत सुगावे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना, सदर कृषी व पशु प्रदर्शन हे उत्कृष्ट पद्धतीने भरविल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले, त्याच पद्धतीने माळेगाव यात्रेच्या धर्तीवर घुंगराळा गावची यात्रा अतिशय चांगल्याप्रकारे वाटचाल करीत आहे, व अशा कृषी व पशु प्रदर्शनाने शेतकरी व पशु पालकांमध्ये अधिकाधिक उत्साह निर्माण होईल, शेती व्यवसाय निश्चितच समृद्ध होईल, असे मत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार गावातील बाहेरगावी शासकीय/खाजगी नोकरी करणाऱ्या भूमिपुत्रांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
या वेळी किशनराव पा. ढगे, संभाजीराव तुरटवाड, गोविंदराव पा. शिंदे, व्यंकटराव कंचलवाड, संभाजी कोंडजी पा. सुगावे, शेषेराव पा. ढगे, माधवराव पा. ढगे, शंकरराव यमलवाड, गंगाधरराव जक्केवाड, बालाजीराव हाळदेवाड, विश्वनाथ सिद्धेवाड, नागोराव बोधनकर, गंगाधरराव बोधनकर, शिवाजी पा. ढगे, गजानन कंचलवाड, साईनाथ पा. सुगावे, सूरज पा. सुगावे झ राजेश पा. ढगे, शंतनू पा. ढगे, योगेश पा. ढगे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी यात्रा समिती, मंदिर देवस्थान, ग्रामविकास अधिकारी श्री हणमंत शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र पा. ढगे, बाजीराव पा. ढगे, पंढरीनाथ संदपणवार, सचिन गजभारे, केशव सूर्यवंशी यांच्यासह समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले..
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy