घुंगराळा सेवा सहकारी सोसायटीवर वसंत सुगावे पाटील यांचे एकहाती वर्चस्व, १३ पैकी १३ जागा प्रचंड मताधिक्यांनी विजयी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील बहुचर्चित असणारी घुंगराळा सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूकीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या म्हाळसाकांत सहकार विकास पँनलचे सर्वच्या सर्व 12 उमेदवारांनी प्रचंड मतांनी विजय मिळवत सेवा सहकारी सोसायटी वर सत्ता मिळवली.

     अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत दोन स्वतंत्र पँनल एकमेकांसमोर उभे टाकले होते. या निवडणुकीत विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातून वसंत सुगावे पाटील यांच्या पँनलचे गणेशगिर गिरी हे अगोदरच बिनविरोध निवडून आले होते .त्यानंतर राहिलेल्या 12 जागांसाठी अत्यंत अटीतटीची व चुरशीची लढत झाली मात्र मतदारांनी वसंत सुगावे पाटील यांच्या पँनलला पसंती देऊन सर्वच्या सर्व 12 उमेदवारांना 70 ते 80 मतांच्या फरकांनी विजयी करून विरोधी गटाचा धुव्वा उडविला. मतदारांनी दिलेला कौल बघून वसंत सुगावे पाटील यांचे घुंगराळा गावावरील नवनिर्वाद वर्चस्व दिसून आले.
      विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी या प्रवर्गातून स्वतः पँनलप्रमुख वसंत सुगावे पाटील,श्यामराव यमलवाड, चंद्रप्रकाश पा. ढगे, केरबा पा. सुगावे,संभाजीराव तुरटवाड, माधवराव ढगे, मारोतराव कंचलवाड, किसनराव दंडेवाड, हे उमेदवार विजयी झाले. तर महिला प्रवर्गातून माजी सरपंच सौ. शकुंतला मातावाड, सौ. संगीता बोधनकर, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आनंदा पांचाळ, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून शंकर सूर्यवंशी आदी उमेदवार विजयी झाले.
     विजयी उमेदवारांचे गावकऱ्यांनी हार घालून व फटाके फोडून स्वागत केले. यावेळी कुंटूर, कुंटुर तांडा,कुष्णुर, वंजारवाडी, सावरखेड, रुई, देगाव, पाटोदा, बरबडा यासह अनेक गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पँनलप्रमुख वसंत सुगावे पाटील व विजयी उमेदवारांचा सत्कार केला. तसेच घुंगराळा गावचे ग्रामविकास अधिकारी श्री हणमंतराव शिंदे साहेब यांनी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा शाल, पुष्पहार घालून अभिनंदन केले.
 म्हाळसाकांत सहकार विकास पँनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केल्याबद्दल पँनलप्रमुख वसंत सुगावे पाटील यांनी गावकऱ्यांचे व मतदारांचे आभार मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या