पत्रकारांना कोवीड लस देण्याची मागणी !

(विशेष प्रतिनिधी/ रियाज पठान)

लोहा तालुक्यासहीत राज्यातील पत्रकारांना राज्य शासनाने मोफत कोवीड लस द्यावी अशी मागणी लोहा पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याकडे लोहा तहसीलदारां मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

पुढे निवेदनात असे नमूद केले की,कोरोना या संसर्गजन्य महामारीच्या काळात पत्रकारांनाही कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे समाज जागृती केली कोरोना पासून बचावासाठी जनजागृती केली अनेक विधायक बातम्या देणे,लेख देणे,आदी कार्य केले आहे.

राज्यात कोरोनाचे प्रमाण सध्या जरी कमी झाले असले तरी पूर्णपणे संकट टळले नाही दररोज अनेक रुग्ण आढळत आहेत. यासाठी कोरोनावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी शासनाच्या वतीने आरोग्य कर्मचारी ,पोलीस कर्मचारी आदी ना कोवीड लस देण्यात येत आहे त्याच प्रमाणे पत्रकारांनाही कोरोना पासून बचाव होण्यासाठी कोवीड लस मोफत देण्यात यावी त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यात तालुक्यात व गावागावात सर्व नागरिकांना कोरोना पासून बचाव होण्यासाठी तंदुरस्त महाराष्ट्र राहण्यासाठी शासनाने कोवीड लस द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर पत्रकार विलास सावळे,श्याम पाटील नळगे,संजय कहाळेकर,शिवाजी पांचाळ,शिवराज पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ताज्या बातम्या