• प्रतिस्पर्धी पॅनलच्या दोन मोठ्या नेत्यांवर आली आत्मपरीक्षण करण्याची वेळ !
( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही दिनांक 16 रोजी पार पडली असून या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत गोदावरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार बहुमताने विजयी होत भाजपा पुरस्कृत असलेल्या सोसायटी पुनर्विकास पॅनेलचा दारुण पराभव केला आहे.
कुंडलवाडी येथील शेतकऱ्यांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक ही दिनांक 16 रोजी पार पडली असून, या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत असलेल्या गोदावरी विकास पॅनलचे प्रमुख साईनाथ उत्तरवार व सुनील बेजगमवार यांच्या नेतृत्वाखाली 13 उमेदवार तर भाजपचे डॉ विठ्ठल कुडमूलवार व काँग्रेसचे बंडखोर डॉ एस एस शेंगुलवार यांच्या नेतृत्वाखाली 12 उमेदवार रिंगणात उभे होते. या निवडणुकीच्या प्रचारार्थ काँग्रेसचे जेष्ट नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार जितेश अंतापूरकर तर भाजपाकडून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सभा घेतल्या होत्या,या चुरशीच्या लढाईत काँग्रेसच्या गोदावरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी होत भाजप पुरस्कृत सोसायटी पुनर्विकास पॅनेलचा धुव्वा उडवत दारुण पराभव केला आहे.
या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून अर्जुने प्रकाश 796 मते विजयी,अहमदमिया दाऊदमिया 349 पराभूत, कदम नागराव 341 पराभूत, डॉ विठ्ठल कुडमुलवार 400 पराभूत, कोटलावार शिवराम 361 पराभूत,कोटलावार हाणमलू 778 विजयी, गंगोणे संजय 765 विजयी, टेकाळे गणपत 768 विजयी,दीडशेरे चक्रधर 782 विजयी,नरावाड गंगाधर 788 विजयी, परसुरे शंकर 351 पराभूत, पाटील माधवराव 767 विजय, पप्पूलवार पंढरी 343 पराभूत, बेजगमवार सुनील 801 विजयी, बोंमले संभाजी 341 पराभूत,शिरगिरे पिराजी 343 पराभूत,महिला राखीव मध्ये गट्टूवार धुरपतबाई 820 विजयी,जोगदंड प्रशुधाबाई 804 विजयी,पोरडवार शोभा 361 पराभूत, इतर मागासवर्गीय खेळगे गंगाधर 818 विजयी,शिवशेट्टे संतोष 390 पराभूत, विमुक्त जाती/जमाती भोरे साईनाथ 392 पराभूत,होरके लक्ष्मण 824 विजयी, अनु जाती/जमाती कोमुलवार दत्ता 787 विजयी,डॉ शेंगुलवार साईनाथ 424 पराभूत,अशी मते उमेदवारांना मिळाली आहेत.
या निवडणुकीत दोन मातब्बर नेते एकत्र येऊनही त्यांना एकही जागा निवडून आणता आली नाही याची नामुष्की त्यांच्यावर ओडवली आहे. शेतकऱ्यांनीही त्यांना स्बसेल नाकारल्यामुळे त्यांच्यावर खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असली तरी,पुन्हा एकदा काँग्रेसने सोसायटीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे…यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आर जी उल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राध्यक्ष म्हणून आर पी देगलूरकर,के डी गव्हाणे,बी पी तलरवार, पी जी पप्पूलवार, काम पाहिले तर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, शिवप्रसाद कत्ते,पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले व त्यांचे सहकारी यांनी केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy