गोदावरीबाई सुर्यवंशी यांचा उपविभागीय अधिकारी यांनी केला गौरव !

( प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )
बिलोली तालूक्यातील गागलेगाव बीट मधिल कोळगाव येथील आंगणवाडी सेविका गोदावरीबाई सुर्यवंशी त्यांचा २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नादेड डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते गोदावरीबाई सूर्यवंशी यांनी मतदार निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन उत्कृष्ट काम केल्या बद्दल डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
बिलोली तालुक्यातील कोळगांव येथे गोदावरीबाई सुर्यवंशी हे मागील ३२ वर्षापासून आंगणवाडी सेविका म्हणून आंगनवाडी चिमुकल्यांना ज्ञानदान करण्याच काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेत राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते गागलेगाव विभागातून (१) गोदावरीबाई सुर्यवंशी (२) माधव दत्तराम लोलमवाड- पर्यवेक्षक (3) राहुल वैजनाथ कदम- बी.एल.ओ या तिघांचा गौरव करण्यात आला आहे.
हा मान मिळाल्याने त्यांचा गौरव पत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तसेच उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, अपर जिल्हा अधिकारी पांडूरंग बोरगावकर आदीसह सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या