गोळेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी बालाजी पवार तर व्हा.चेअरमन पदावर विलास पवार यांची बिनविरोध निवड
पंचविस वर्षापासून सोसायटी वर पवार यांची एक हाती सत्ता..
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील गोळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बालाजी अंताजी पवार तर व्हा.चेअरमन पदावर विलास पवार यांची दि.२ ऑगस्ट रोजी सर्व संचालकाचा उपस्थित बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे मागील पंचविस वर्षा पासून पवार यांची या सोसायटी वर एक हाती सत्ता असून येथील व्यवहार तालुक्यात अव्वल क्रमांकावर आहे. बिनविरोध निवडून आलेल्या मान्यवर मंडळींचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात तालुका संघाचे अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण, तात्कालिन सभापती संजय बेळगे, एज्युकेशन सोसायटी चे सचिव प्रा.रविंद्र चव्हाण सह मान्यवर मंडळी च्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
नायगाव तालुक्यात बहुचर्चित असलेल्या गोळेगाव सोसायटी वर जिल्हाबॅकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण समर्थक बालाजी पवार यांची एक हाती सत्ता आहे. सर्व संचालक त्यांच्याच गटाचे आहेत.दि.२ ऑगस्ट रोजी निर्वाचन अधिकारी एम.आय.अल्ली सहाय्यक शंकराला करखेले यांनी गोळेगाव सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी साठी सोसायटी च्या कार्यालयात निवड सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी चेअरमन पदासाठी बालाजी अंताजी पवार व व्हा.चेअरमन पदासाठी विलास दिगाबंर पवार यांचे एकमेव अर्ज आल्याने या दोघांची भान विरोधक निवड करण्यात आल्याचे जाहीर करताच गावात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी निवड करण्यात आलेल्या पदाधिकार्याचा गावकरी व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
निवडीच्या वेळी अशोकराव पवार,एन.डी.पवार,एस.बी.पवार,श्रीमती शंकुतला पवार,श्रीमती सुलोचना पवार,श्रीमती कमलबाई वाघमारे, बळीराम पवार,वामनराव पवार,उत्तमराव पवार,व्यकंटी पुरी,भगवान पुरी, बि.आर पवार व सुरेश धमनवाडे, सुभाष पवार सह गावातील मान्यवंराची उपस्थिती होती. या वेळी निर्वाचन अधिकारी व सर्व संचालक मंडळाचा सत्कार गावकर्याच्या वतीने करण्यात आला.
सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या हिताची कामे करण्यास आपण प्राधान्य देणार असून भविष्यात गोळेगाव सेवा सहकारी सोसायटी नेहमी प्रमाणे प्रथम क्रमांकावर रहाण्यासाठी प्रामाणीक पणे काम सर्व संचालकाना विश्वासात घेवुन करणार असल्याची ग्वाही चेअरमन पवार यांनी या वेळी दिली.
- नायगाव सोसायटीत सत्कार !!
नायगाव सेवा सहकारी सोसायटी चे व्हा.चेअरमन किशनराव बोमनाळे, सचिव शंकरराव करखेले, वरवठे, बालाजी शिर्के, भगवान चव्हाण यांच्या सह मान्यवर मंडळी च्या उपस्थितीत नवनिर्वाचीत चेअरमन बालाजी पवार यांचा सत्कार बुधवारी सकाळी करण्यात आला.
www.massmaharashtra.com