मनोभावाने सेवा करणारे गोपाळ गहला सेवानिवृत्त !
(रायगड/म्हसळा प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंके यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या गुरुदेव परंपरेत गोपाळ गहला यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. बापूजींच्या सहवासात गोपाळ गहला यांच्या व्यक्तीमत्वाची आणि कार्याची जडणघडण झाली आहे, असे प्रतिपादन रायगड ठाणे विभाग प्रमुख भाऊसाहेब सांगळे यांनी केले. गोपाळ गहला यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सांगळे बोलत होते.
या प्रसंगी ठाणे रायगड विभागाचे निरीक्षक संजय महाजन,स्कुल कमेटी चेरमन समीर बनकर, म्हसळा हिंदू समाज संघटनेचे अध्यक्ष सुभाष करडे, मा.नगराध्यक्ष दिलीप कांबळे, प्राचार्य प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजय महाजन म्हणाले विद्यालयाची सुरक्षितता, पवित्रता आणि स्वछता यांचे जतन करण्याचे काम गोपाळ गहला यांनी आपल्या सेवा काळामध्ये केल आहे. स्कुल कमिटीचे चेअरमन समीर बनकर म्हणाले की, न्यू इंग्लिश स्कुलची आपल्या परिवारासहित सेवा करणारे गहला खऱ्या अर्थाने विद्यालयचे भूषण आहेत.
सुभाष करडे म्हणाले कि, “म्हसळा परिसरात विद्यालयचे नावलौकीक वाढवणाऱ्या मध्ये गोपाळ गहला यांचे योगदान कोणीही विसरू शकणार नाही”.
माजी नगराध्यक्ष कांबळे म्हणाले “या विद्यालयाचा माजी विदयार्थी म्हणून समाज जीवनात काम करण्याची मला जी संधी मिळाली ती संधी विदयार्थी जीवनात असताना गहला यांच्या काम कारण्याच्या पद्धती मुळे मी प्रभावित झालो”.
प्राचार्य मोरे सर आपल्या प्रास्ताविक भाषणात गोपाळ गहला यांच्या कार्याची प्रशंसा करून गहला यांचे कार्य इतरांना आदर्शवत आहे असे म्हणाले.
प्रा.महम्मद शेख आपल्या मनोगतात म्हणाले, “गोपाळ गहला यांची कामावरील निष्ठा आणि तळमळ आम्हाला वारसाहक्काने मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो”.
प्रा.सौ.शेटे यांनी गहला यांच्या कार्याचा अत्यंत प्रभावी पणे परिचय करून दिला.
गोपाळ गहला यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन चंद्रकांत गांजरे सरांनी केले आणि आभार ए.सी.पाटील सर यांनी मांडले.
कार्यक्रमास शिक्षक,कर्मचारी,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.