गोरठा येथे सरपंच पदी सौ.स्वरूपा सूर्यवंशी तर उपसरपंचपदी सौ.भागीरथा पालदेवाड यांची बिनविरोध निवड !
(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)
ग्रामपंचायत कार्यालय गोरठा येथे दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पी.डी.मुरादे व ज्ञानेश्वर कोंडामंगल-ग्रामसेवक यांच्या अधिकाराखाली सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.
माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या गटाचे नऊ उमेदवार ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले.
स्पष्ट बहुमत असल्याकारणाने गोरठेकर गटाचे सरपंचपदी सौ.स्वरूपा सूर्यवंशी तर उपसरपंच पदी सौ.भागीरथा पालदेवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.