गोरठेकर विद्यालयात ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा उत्साहात साजरा !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
बापूसाहेब देशमुख गोरठेकर माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. खदगाये सर प्रमुख पाहुणे श्री. सतीशराव देशमुख, प्रल्हाद पा.जाधव रामा कवडीकर, जक्कोजी कवडीकर, मंगलवाड गुरुजी होते.
याठिकाणी कोंडीबा संबोड, जक्कोजी कवडीकर, रामजी पांचाळ, रामा कवडीकर, नागोराव पा. जाधव, मारोती डोपेवाड, राजाराम मनोलवार, गंगाधर कीनेवाड यांचा जेष्ठ नागरिक म्हणून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास मु.अ.श्री.सुरकुटवार, मु.अ.श्री. हिवराळे सर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागतगीत विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रस्ताविक मु.अ. एस. एन. सुरकुटवार तर श्री.पवार सर व कोलेवाड सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सुत्रसंचलन श्री. जगदंबे सर व आभार प्रदर्शन श्री. तुंबवाड सर यांनी केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या