दिनदुबळ्या दिव्यांगाच्या चळवळीची ऑनलाईन बातमी युट्युब, पोर्टल मिडीयाने दखल घेतल्यामुळे शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार लखुजीराजे जाधव व माँसाहेब जिजाऊ यांचे १४ वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव, यांच्या हस्ते माझा सन्मान झाला – चंपतराव डाकोरे पाटिल
दिनदुबळ्या दिव्यांगाच्या चळवळीची ऑनलाईन बातमी युट्युब, पोर्टल मिडीयाने दखल घेतल्यामुळे शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार लखुजीराजे जाधव व माँसाहेब जिजाऊ यांचे १४ वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव, यांच्या हस्ते माझा सन्मान झाला – चंपतराव डाकोरे पाटिल
शिवस्वराज्य युवा संघटनेच्या पाचव्या वर्धापण दिनानिमित्य दिनांक 12 फेब्रुवारी २०२३ रोजी चैतन्य सभागृह नवीन पवनानगर, चिंचवड, पुणे- येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळयात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखुजीराजे जाधव व माँसाहेब जिजाऊ यांचे १४ वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव, तर प्रमुख पाहुणे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय महेश डोंगरे-पाटील, पिंपरी चिंचवड काँग्रेस कामगार नेते कैलास (भाऊ)कदम, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बापट साहेब, समाजसेवक संजय बाबा ननवरे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, पंढरपूर नगरपरिषद नगरसेवक सुनिल भाऊ डोंबे, पंढरपूर नगरपरिषद नगरसेवक महादेव धोत्रे हे उपस्थित होते.
हा पुरस्कार वरील मान्यवराच्या हस्ते दिव्यांग, वृध्द, निराधारांना न्याय मिळावा म्हणुन सतत संघर्ष करनारे दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव विश्नंनाथराव डाकोरे नांदेड यांना ट्राफी, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन माँसाहेब जिजाऊ यांचे १४ वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव व ईतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
महाराष्टातील सतरा उत्कृष्ट काम करनाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२) संपादक पत्रकार मिर्झागालिब रज्जाक मुजावर मांजरी ३) उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गोविंद गोसावी चिंचपूर इजदे
4) उत्कृष्ट शस्त्र व युद्धकला अभ्यासक रविंद्र भाऊसाहेब जगदाळे तळेगाव
5) उत्कृष्ट वकील अँड वैशालीताई चांदणे पर्वती पायथा पुणे 6) उत्कृष्ट शैक्षणिक शिक्षक प्रा.रामलिंग लक्ष्मण सावळजकर अकलूज
17) उत्कृष्ट प्रगतीशील फळबाग शेतकरी संदिप सुभाष जाधव-पाटील गुरसाळे पंढरपूर यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.
अशी माहीती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील, शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र किंटे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष यश घरत, विद्यार्थी प्रदेश संघटक रूपेश जाधव, पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे सर्व पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते ऊपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy