शिष्यवृत्ती परीक्षेत के रामलू शाळेची उतुंग भरारी; 38 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत के. रामलू पब्लिक स्कूलच्या वर्ग पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे,दरवर्षीप्रमाणे यंदाही के. रामलू शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवत ३८ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले.
त्यात क्रांती लिंगमपल्ले हिने २१६, श्रीजा पाठक २१४,शुभम जोशी २१०, श्रेयश झंपलकर २०४, पियुष हमंद २०२, प्रणव भोरे १९८, वरद येमेकर १९६, श्रेया जजगेकर १८८,कृष्णा दम्मेवार १८६, यश भांगे १७८,प्रतिभा शिंदे १७४, अक्षिता नरावाड १७२, तुषार गादगे १७०, पवन कोशकेवार १६८, सात्विका कोलंबरे १६८, पूजा शिनगारे १६६, अविनाश नरावाड १६२, त्रिविक्रम बाभळीकर १६२,दानिश सय्यद १६२, गणेश ब्यागलवार १६०,मयुरी सोळंके १५८,सार्थक पेंटावार १५८, वैष्णवी कोंडावार १५४, शुभदा दरबस्तेवार १५०, अवंतिका भोरे १४८, गायत्री येप्पुरवार १४८, वैष्णवी मरकंटेवार १४८, राजन पुप्पलवार १४४, पूर्वजा कुलकर्णी १४०, मनोज खांडरे १४०, तहूरा शेख १४०, कृतिका खेळगे १३६,श्रृती हाके १३६, राशी येमेकर १२८, ओमकार ब्यागलवार १२२ गुण घेऊन पात्र ठरले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेचे संस्था अध्यक्ष श्री सायरेडडी ठक्कूरवार सचिव श्री यशवंत संगमवार ,संचालिका रमा ठक्कूरवार मुख्याध्यापक श्री मठवाले, व पर्यवेक्षक श्री कागळे यांनी अभिनंदन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या