‘मॉम’ परीक्षेत श्रेयस झंपलकर, आर्यन शारवाले नांदेड जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकावर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 एमकेसीएल तर्फे नुकतेच घेण्यात आलेल्या ‘मॉम'( महाराष्ट्र ऑलंपियड मूव्हमेंट) या ऑनलाइन स्पर्धा परीक्षेत कुंडलवाडी शहरातील दोन शाळेतील दोन विद्यार्थी सदर परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून तिसरा क्रमांक मिळविल्याने दोन्ही विद्यार्थ्यांना सृष्टी कॉम्प्युटरच्या कार्यालयात प्रत्येकी एक एक हजार रुपयाचे धनादेश देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, नोव्हेंबर 2022 मध्ये एमकेसीएल तर्फे ‘मॉम'( महाराष्ट्र ऑलंपियड मुव्हमेंट) एक ऑनलाईन स्पर्धा परीक्षा संगणकावर घेण्यात आली होती. या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत कुंडलवाडी येथील के. रामलू पब्लिक स्कूल, इयत्ता नववी मध्ये शिकणारा विद्यार्थी श्रेयस बालाजी झंपलकर व मिलिंद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवी वर्गामध्ये शिकणारा विद्यार्थी आर्यन एकनाथ शारवाले हे नांदेड जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकावर आल्याने त्यांना एमकेसीएल कडून प्रत्येकी 1000 रुपयाचे धनादेश आले आहे.
.सदर धनादेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हुनगुंदा येथील मुख्याध्यापक लक्ष्मण रामपुरे सर यांच्या हस्ते देऊन दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. याप्रसंगी सृष्टी कॉम्प्युटरचे संचालक विजय चौधरी ,बिलोली गटसाधन केंद्राचे सौ. अर्चना अन्सापूरे, मिलिंद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक तथा पञकार सुभाष दरबस्तेवार,एन. एन .लाड, विद्यार्थ्यांचे पालक तथा सहशिक्षक बालाजी झंपलकर, दादाराव येलमे, सूर्यकांतराव अन्सापूरे आदी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या