प्राथमिक आरोग्य केंद्र कुंटूर हायटेक नविन इमारतीला लागली गळती !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर हे गाव चर्चेत आहे. गावाच्या व परिसराच्या आरोग्यासाठी, आवश्यक असलेली कुंटूर शासकीय रूग्णालयाची नविन हायटेक इमारत चार दिवसांपासून पावसाच्या हलक्या पावसामुळे गळत आहे. पावसाच्या हलक्या सरी पडत असूल्यामुळे कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतील आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, प्रयोगशाळेसह बहुतांश ठिकाणी गळती लागली आहे.

नवीन बांधकाम झालेला कम्युनिटी हॉलला पूर्णतः गळती लागलेली आहे. यासोबत काही क्वाटर्सला गळती लागली आहे. जवळपास चार कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीला गळती लागली आहे.

कुंटुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत १९८० पासून रुग्ण सेवेसाठी होती. स्वर्गवासी माजी मंत्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही हायटेक इमारत मंजुर झाली.  इमारतीचे पूर्ण काम झाले आहे मात्र इमारत ताब्यात घेण्यास नाकारत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कुंटूर सर्कल २२ गावाच्या संपर्कात आहे. शासनाने २४ तास सुविधा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

येथे महिन्याकाठी १०० ते १२० कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होतात, तर दररोज २०० ते २५० रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात तपासणी व औषधोपचार करण्यात येतात. गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे नविन बांधकाम झालेले हायटेक इमारत उद्घाटन होण्या पुर्वीच गळीती लागली आहे. आरोग्य केंद्राच्या इमारतीतील ऑपरेशन थिएटर, आंतररुग्ण व बाह्य रुग्ण विभागात पावसाचे पाणी गळत असल्याचे दिसत आहे.
सध्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बांधकाम सुरू असल्याने चार वर्षे पासून बंद आहे. चार वर्षांपासून बांधकाम करण्यात आलेल्या नवीन हायटेक इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन ताब्यात घेण्यात येणार आहे. चार कोटी पन्नास लाख रुपये खर्च करून बांधकाम केले आहे.
गुत्तेदार आपल्या मलीदेपोटी बोगस काम करुन थातुर मातूर काम करुन ही हायटेक इमारत उभी केली आहे. ही इमारत बांधकाम पूर्ण करून देण्याची वेळ १५ महिने होऊन गेले. तरी देण्याच्या वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी झाला आहे, अद्याप इमारतीची तयार झालेली नाही. इमारतीची दुरुस्ती लवकर करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या