शेतकऱ्यांनी के वाय सी करून अतिवृष्टीचे अनुदान उचलावे ; तलाठी पवन ठकरोड यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी सज्ज अंतर्गत असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आधार प्राधिकरण (के वाय शी )अपडेट करून अतिवृष्टीचे आलेले अनुदान उचलावे असे आवाहन तलाटी पवन ठकरोड यांनी केले आहे.
कुंडलवाडी शहर व परिसरात गत वर्षी मोठ्या प्रमाणत अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या अनुषंगाने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचे अनुदान बँक जमा हि झालेले आहे. कुंडलवाडी सज्जा अंतर्गत असलेल्या 170 शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान जमा झाले पण अनेक शेतकऱ्यांनी आधार प्राधिकरण (के वाय शी )केल्या नसल्यामुळे सदरील शेतकऱ्यांना अनुदान उचलता येत नाही, त्यामुळे अतिवृष्टी ग्रस्त लाभार्थ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन के वाय शी अपडेट करून अनुदान उचलावे अन्यथा सदरील अनुदान परत जाईल असे आवाहन तलाटी पवन ठकरोड यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या