शासकीय निवास बांधकामाचे तीन तेरा ; निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची उच्चस्तरीय मागणी !

[ नायगाव बा.ता. प्र – गजानन चौधरी ]     

 शासकीय कामांमध्ये अधिकारी कर्मचारी वेळेवर यावेत ,गोरगरीब नागरिकांचे शासकीय कामे वेळेवर व्हावे या उद्देशाने शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून निवासाची व मीटिंग हॉलची व्यवस्था जवळपास 25 कोटी रुपयात शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आली. परंतु प्रशासकीय अधिकारी गुत्तेदार यांच्या संघनमताने निष्कृष्ट दर्जाचे कामे होत असून सदरील कामे जास्त काळ टिकणार नाही अशी भीती नागरिकांनी व्यक्त होत असून संपूर्ण कामाचे उच्चस्तरीय चौकशी व्हावी संबंधित कार्यकारी अभियंता व विभागीय अभियंता संबंधित अधिकाऱ्याची गुत्तेदारांचे चौकशी होऊन होऊन संबंधितावर कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
Government Residencial construction
शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेवासाची व मीटिंगची उत्तम सोय व्हावी म्हणून तहसील कार्यालयाच्या भोवतालीची संरक्षण भिंत नायगाव येथील तहसील च्या शेजारी असलेल्या जागेत जवळपास 25 कोटी रुपये शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले संबंधित काम प्रशासनाला दिलेल्या निविदा प्रमाणे न होता सदरील बांधकामात पाया भरण्यासाठी माती मिश्रित मुरूम वापरण्यात आले तर बांधकामात निष्कृष्ट दर्जाचे वाळू ऐवजी सील कोड ची बुकटी वापरून बांधकाम करण्यात आले सदर कामात तुरळक प्रमाणात गिलाव्यासाठी व बांधकामात वाळूचा वापर करण्यात आला तसेच बांधकामाच्या विटा ह्या मातीच्या भाजलेल्या नसून केमिकल सिमेंट पासून बनवलेल्या निष्कर्ष दर्जाच्या वापरण्यात आल्या तसेच बांधकामांमध्ये पिल्लरला बोरच्या पाण्याची सा व्यवस्था नसल्यामुळे पाण्याची क्युरीग ही टँकरद्वारे पाणी आणून दहा ते पंधरा दिवस न वापरता तुरळक पाण्याचा वापर करण्यात आला. 
तसेच छतावर 21 दिवसाची पाण्याची क्युरिंग न करता कमी प्रमाणात केल्यामुळे सदरील काम शासनाने नेमून दिलेल्या निवेदाप्रमाणे न झाल्यामुळे निष्कर्ष दर्जाचे होत असल्याने या कामाकडे संबंधित कार्यकारी अभियंता कोटलवार, विभागीय अभियंता बारस्कर ,संबंधित कनिष्ठ अभियंताचे गुत्तेदार लातूर येथील जोगदंड कन्स्ट्रक्शन यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे मार्च एंड यांच्या आधी बिल काढण्याच्या घाई मध्ये सदरील काम किती काळ टिकेल की लवकरच पडून जाईल अशी भीती नागरिकातून होत असल्याने या संपूर्ण कामाची खासदार ,आमदार, संबंधित प्रशासकीय उच्चस्तरीय चौकशी नाशिक येथील गुननियंत्रण अधिकाऱ्या मार्फत व्हावे व संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांत मोठ्या प्रमाणात होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या