शासकीय वाळू डेपो चालू पण घरकुल लाभार्थी वाळू पासून वंचित ; ऑन लाईन साईट बंद असल्यामुळे घरकुल लाभार्थी चिंतेत !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
           बिलोली तालुक्यात नागणी, येसगी,सगरोळी,येथे शासकीय वाळू डेपो चालू करण्यात आले आहे तर वाळू अभावी घरकुलाचे बांधकाम रखडलेल्या अनेक लाभार्थीनी गेल्या अनेक दिवसापासून सेतू सुविधा केंद्र येथे नाव नोदणीसाठी साठी पायपीट करीत आहेत पण ऑनलाईन साईट सतत बंद असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागत आहे त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वाळूपासून वंचित राहावे लागते की काय ? या चिंतेत लाभार्थी असल्याचे दिसून येत आहे.
           कुंडलवाडी शहर व परिसरात पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात असून अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत तर अनेकांचे बांधकाम वाळू अभावी रखडले आहे.असे असले तरी शासनाच्या वतीने बिलोली तालुक्यातील नागणी,येसगी,सगरोळी,आदी ठिकाणी शासकीय वाळू डेपो चालू करण्यात आले तर घरकुल लाभार्थ्यांना सेतू सुविधा केंद्र येथे ऑन लाईन नाव नोदणी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्या अनुषगाने गेल्या आठ दिवसांपासून घरकुल लाभार्थीनी सेतू सुविधा केंद्र येथे नाव नोदणीसाठी दिवसभर पायपीट करताना दिसून येत आहे तर प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे सतत ऑन लाईन सर्व्हर डाऊन दाखवत असल्यामुळे लाभार्थी हे व्यतीत झाल्याचे दिसून येत आहे.
            असे असले तरी प्रशासनाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन साईट वर टाकण्यात आले असून कधी कधी साईट चालू असताना घरकुल लाभार्थी ऑन लाईन नाव नोदणी करतांना ‘नॉन एक्झीट लिमिट’ असे दाखवत आहे तर इतर लोकांसाठी नाव नोदणी मात्र होताना दिसून येत आहे त्यामुळे प्रशासन हे घरकुल लाभार्थ्यांना वगळून इतर लोकांसाठी शासकीय वाळू डेपो चालू केला आहे का? असा प्रश्न लाभार्थी विचारताना दिसून येत आहे. असे असले तरी खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून देऊन ऑन लाईन सर्व्हर नियमित चालू ठेवावे अशी मागणी महसूल प्रशासनाकडे घरकुल लाभार्थी करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या