पत्रकार गोविंद नरसीकर यांना मातृशोक !

[ नरसी फाटा वार्ताहर – गणेश कंदुरके ]
मराठी पत्रकार संघाचे नरसी शहरध्यक्ष गोविंद टोकलवाड नरसीकर यांच्या मातोश्री जेष्ठ महिला स्व.गंगाबाई रामराव टोकलवाड यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने काल दिनांक ५ रोजी रात्री दहा वाजता निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी दिनांक ६ रोजी नरसी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण, माणिकराव लोहगांवे, केशवराव पाटील चव्हाण , मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर, संभाजी भिलवंडे, श्रावण पाटील भिलवंडे , मोहन भिलवंडे , व्यंकट कोकणे , मनोहर पवार , बालाजी मद्देवाड ,रविंद्र पाटील भिलवंडे , बालाजी मसलगेकर,सुर्यकांत जाधव , यासह अन्य जन व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पाश्चात एक मुलगी,तिन मुले नातु पंतु असा मोठा परिवार आहे. त्या शंकर टोकलवाड,जिवन विकास शाळेतील शिक्षक नंदकिशोर टोकलवाड यांच्या मातोश्री होत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या