बिलोली तालुक्यात आनंदी शिधा शंभर टक्के वाटप. राहिलेल्या गावांतील कार्डधारकांणा आनंदी शिदा वस्तू मिळणार – नायब तहसिलदार निलावाड

[ बिलोली प्रतिनीधी – सुनिल जेठे ]
बिलोली तालुक्यातील आनंदाचा शीधा दिपावाली निमीत्त स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत वाटप करण्यात आले असुन या़ंचा लाभ गोर गरीब जनतेला झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिधा वाटप करण्यात आला.
बिलोली तालुक्यात एकुण ९८ स्वस्त धान्य दुकान असुन पैकी ३३ दुकानात रवा, तेल, साखर, चनादाळ १००% वाटप करण्यात आले. तर नादेड जिल्हा वितरण व्यवस्थेच्या हलगर्जी पणा मुळे ५६ दुकानास ३ वस्तु मिळाले. तर ७ दुकानास २ वस्तू आणि २ दुकानास १ वस्तु देण्यात आले आहे. 
 पुरवठा विभागाच्या यंत्रणा कडुन थोडीसी हलगर्जी झाली असली तरी येत्या काही दिवसात लवकरच गोदामात माल पुरवठा होताच उर्वरीत वस्तु वाटप करण्यात येईल. अशी माहीती बिलोली तहसिल चे पुरवठा आधिकारी उत्तम निलावाड यानी यांनी दिली.
माहिती सांगत असताना ऐन दिवाळी सणात स्वतः ची दिवाळी साजरी न करता ईतराची दिवाळी गोड कशी होईल यासाठी हमाल कामगार परिश्रम घेतल्याने स्वस्त धान्य दुकानाचे राशन व आनंदी शिधा जनतेला वेळेवर दिले असल्यामुळे नायब तहसिलदार निलावाड यांनी हमाल कामगारांचे कौतुक केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या