आता ग्रामपंचायतचे दाखलेही मिळवा घरबसल्या आपल्या मोबाईलवर !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आज पर्यंत जमिनीचा ७/१२ आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर बघता येत होता. परंतु गावठाण हद्दीमध्ये असलेल्या प्रॉपर्टीचा उतारा किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म नोंद प्रमाणपत्र, मृत्यू नोंद प्रमाणपत्र असे बरेच दाखले जे ग्रामपंचायत मार्फत दिले जातात. ते घरबसल्या ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईल द्वारे पाहू शकतो. याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत मध्ये असलेली बॉडी किंवा अधिकारी वर्ग यांची संपूर्ण माहितीसुद्धा या एप्लीकेशन वर आपल्याला सहजरित्या बघता येणार आहे.
आपल्याला ग्रामपंचायतीची बरीच माहिती ऑनलाइन बघता येत नव्हते त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने एक नवीन एप्लीकेशन नुकतंच लॉन्च केलेलं आहे ज्याचं नाव आहे “महा इ ग्राम सिटीजन कनेक्ट” (mahaegram Citizen Connect) या एप्लीकेशन द्वारे आपण घरबसल्या ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईल द्वारे पाहू शकतो.
त्याचबरोबर दरवर्षी आपण आपली कर वसुली ग्रामपंचायतीकडे भरत असतो ही कर वसुली सुद्धा आपल्याला या एप्लीकेशन द्वारे घरबसल्या बघता येणार आहे. हे अँप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल मधील प्ले स्टोअर मध्ये जाऊन तिथं mahaegram Citizen Connect सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला सहजरीत्या हे एप्लीकेशन मिळून जाईल. प्ले स्टोर मधून एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. सर्वात खाली Don’t have account? register असं लिहिलेलं दिसेल त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. आता तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव आणि आडनाव व्यवस्थित भरा. त्यानंतर तुमचं लिंग पुरुष, स्त्री, इतर यामध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची जन्मतारीख भरा. जन्म तारखेच्या खाली तुमचा मोबाईल नंबर भरा. आता सर्वात शेवटी तुमचा ईमेल आयडी भरा.
वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक टेक्स्ट मेसेज येईल या मेसेज मध्ये तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला असेल जो हे (mahaegram Citizen Connect) एप्लीकेशन युज करण्यासाठी तुम्ही वापरणार आहात.
यूजर आयडी पासवर्ड टाकून एप्लीकेशन ओपन झाल्यानंतर त्याच्या होम पेजवर दाखले/ प्रमाणपत्र, कर भरणा, व्यवहार इतिहास, ग्रामपंचायत पदाधिकारी, आपले सरकार सुविधा, सूचना याची घरबसल्या माहिती मिळेल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum

वरील- लिंक वरुन MAHAEGRAM CITIZEN CONNECT अॅप Download करून घ्यावे.
– आपल्या मोबाईलमध्ये MAHAEGRAM CITIZEN CONNECT अॅप install करावे.
– त्यानंतर रजिस्टर वर क्लिक करुन मोबाईल नंबर नोंद करा.
– आपणास आपला आयडी व पासवर्ड आपल्या मोबाईलवर मेसेज द्वारे मिळतील.
-आपल्याला मेसेज द्वारे मिळालेल्या युजर व पासवर्डने लॉगीन करता येईल.
– आपण आपली ग्रामपंचायत निवडावी आणी आपल्या ग्रामपंचायतची सर्व माहिती पहा.
या अॅप मधुन आपण आपल्या मिळकतीचा नमूना नंबर 8 साठी अर्ज करु शकता, ग्रामपंचायत च्या कराची थकबाकी online payment gateway च्या माध्यमातून भरू शकतो.
तसेच ग्रामपंचायत स्तरावरील (जन्म, मृत्यु, विवाह नोंदणी झालेले) प्रमाणपत्रांसाठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र शासन ऑनलाईन पद्धतीचा वापर करून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा त्रास कमी कसा करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या