आज बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रियेसाठी कर्मचारी सज्ज.

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
बिलोली तालुक्यात ९ पैकी ८ ग्राम पंचायतीच्या सरपंच/सदस्य पदासाठी साठी आज दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणूकीत उमेदवारांना शांततेत मतदान प्रक्रिया पार पडण्या करीता पोलीस / होमगार्ड सज्ज झाले असलेले चिञ बिलोली तहसिल कार्यालयात दिसुन आले.

सदरिल ग्राम पंचायत निवडून लागलेल्या गावात गागलेगाव, दगडापूर, भोसी, हिप्परगाथडी, दौलतापूर, मेळगाव, कोळगाव, हरनाळा, या ग्राम पंचायत साठी निवडणूक होत आहे. उमेदवारांना मतदारांनी मतदान करुन निवडून देणार असल्याने उमेवाराचे लक्ष आज मतदार बंदू/भगिनीकडे डोळे टिपून बसलेले चिञ पहायला मिळणार आहे.
तर टाकळी खु. ही ग्राम पंचायत बिनविरोध निघाल्यामुळे टाकळी खु.येथील सरपंच/सदस्याने निवडणुकीच्या झंझट मधून मुक्त झाले म्हणून टाकळी खु. च्या सर्व उमेदवारांचे तालुक्यातुनअभिनंदन होत आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या