बिलोली तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतचा निकाल जाहीर !

तालुक्यातील 9 ग्रामपंचायत पैकी 7 ग्रामपंचायत मधील सत्ता काॕग्रेस पक्षाच्या ताब्यात तर 2 ग्राम पंचायत अन्य पक्षाच्या हातात.
(बिलोली ता.प्र.सुनिल जेठे)
बिलोली तालुक्यातील नऊ ग्रामपंचायंतीचा निकाल बिलोली तहसिल कार्यालय येथे दि.20 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला. 

 बिलोली तालुक्यातील 9 पैकी 7 ग्राम पंचायत मधील सत्ता काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यात वर्चस्व आज ही असल्याचे सिध्द झाले आहे. बिलोली तालुका काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपंळीकर यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाला आहे अशी चर्चा विजय जल्लोषा दरम्यान ऐकायला मिळाली.
अत्यंत अटीतटीच्या समजल्या जाणा-या कोळगाव ग्राम पंचायतच्या लढतीत सरपंच साईनाथ रामराव पाटील यांचा विजय झाला असून ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या पारड्यात गेली आहे. या विजयामागे रंजीत पा.हिवराळे यांचे उत्तम नियोजन असल्याचे मानले जात आहे.
 या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाघ. यांच्यासह शे.अर्हद मस्तानसाब, महसुल अधिकारी एन.आर.पाचांळ, मुखेडकर दिपक, सहा.मु.आ.ओ रमेश पाचांळ, मु.के.देशपांडे, प्रकाश अवदुते यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. 
नऊ ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर झाल्याने सरपंच, उपसरपंच उमेदवारांकडून विजयाचा मोठा जल्लोष बिलोली शहरात दिसुन आले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या