चारवाडी एकता ग्रामविकास पॅनल विजयी !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर परीसरात चारवाडी ग्रामपंचायत निवडनुक नुकतीच झाली. चारवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिगांबर पाटील माऊले एकता ग्रामविकास पॅनलने ग्रामपंचायतीच्या ७ जांगांपैकी ७ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. पोलिस पाटील याना पॅनलच्या उमेदवारांना एकही जागा जिंकता आली नाही.

चारवाडी ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी रविवार (दि.१८) मतदान झाले. या निवडणुकीत १५उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नायगाव येथील तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास सर्व जागांचे निकाल हाती आले.
या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ मधून सुर्याजी पा चाडकर (सरपंच), सविता साहेबराव मावले, सुनीता आनद गिरी वॉर्ड क्रमांक-२ मधून गंगाबाई लक्ष्मण झगडे, सुमीत्री दिगांबर खन्नपटे, नारायण दत्ता मिसे, जयवंतराव चाडकर, सौ सुलोचना शिवाजी खन्नपटे एकता ग्रामविकास पॅनलचे विजयी झाले.
असे एकता ग्रामविकास पॅनल प्रमुख दिगांबर पाटील मावले, व सरपंच सुर्याजी पा चाडकर साहेबराव मावले यांनी सांगितले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या