ग्रामपंचायत निवडणुकीत नायगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व, सात ग्रामपंचायतवर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे वर्चस्व !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 नायगाव तालुक्यातील आठ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सात ग्रामपंचायत जिंकून कॉंग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले असून भाजपला मात्र एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले.
नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायती
नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायती
नायगाव तालुक्यातील आठ गावच्या निवडणुकीची धुमधाम संपली असून दि.२० डिसेंबर २०२२ रोजी नायगाव तहसील कार्यालयात निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये मारवाडी कोपरा,रूई(खु.) सुजलेगाव, सातेगाव, तलबीड,ताकबीड,पिंपळगाव हे गाव कॉंग्रेसने काबीज केले असून अंतरगाव येथे मात्र भाजपची सत्ता आली आहे.

Grampanchayat

निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे मरवाळी/कोपरा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार छायाबाई केशवराव पवळे हे विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी शाहुबाई वसंत चिखले हे पराभूत झाले. रूई (खु.) येथे सरपंचपदी भगवानराव नारायण जाधव हे विजयी झाले असून रावसाहेब बाबाराव बेलकर यांचा पराभव झाला आहे.
सुजलेगाव येथे सरपंचपदी दत्तात्रय पोचीराम आईलवार हे विजयी झाले असून नागोराव गंगाराम डुमणे यांचा पराभव झाला आहे. सातेगाव येथे सरपंच पदासाठी निलूबाई गोविंद पामलवाड हे विजयी झाले असून लक्ष्मीबाई हुल्लाजी पामलवाड हे पराभूत झाले आहे. अंतरगाव येथे सरपंचपदी गजानन आनंदराव तोडे हे विजयी झाले असून आंनदाबाई विश्वंभर शिंदे यांचा पराभव झाला आहे. तलबीड येथे सरपंचपदी जयश्री पिराजी दासरवाड यांचा विजय झाला असून संगीता बालाजी दासरवाड यांचा पराभव झाला आहे.
ताकबीड येथे सरपंच पदासाठी कल्पना रंजित कुरे हे विजयी झाले असून सुरेखा शिवराज वरवटे यांचा पराभव झाला आहे. पिंपळगाव येथे सरपंचपदी शेख मदारबी अहेमदसाब यांचा विजय झाला आहे.
सरपंच पदासाठी मारवाडी कोपरा साधारण महिला, सुजलेल्या अनुसूचित जाती, अंतरगाव सर्वसाधारण, ताकबीड सर्व साधारण महिला, पिंपळगाव नामाप्र महिला, रुई खुर्द सर्वसाधारण , सातेगाव नामाप्रं महिला , तलबीड नामाप्र महिला, आठ ग्राम पंचायत पैकी पाच ग्रामपंचायतीवर महिला राज्य आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या