माजी.आ.शेतकऱ्यांचे नेते शंकर आंण्णा धोंडगे यांनी बिलोली शासकीय विश्वामगृह येथे कार्यकर्त्यांनी शेतकरी लोहाच्या सभेसाठी जाण्याचे निमित्ताने बैठक संपन्न.

बिलोली माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह कार्यकर्ते व शेतक-यांनी “अबकी बार किसान सरकार” असे नारे देऊन जयघोष केला.

[ बिलोली ता.प्र – सुनील जेठे ]
उद्या 26 मार्च रोजी रविवारी लोहा येथे भारत राष्ट्र समिती BRS पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री ? (KCR) मा.के. चंद्रशेखर राव यांच्या जाहिर सभेचे आमंत्रण देण्यासाठी शंकर अण्णा धोंडगे यांनी बिलोली विश्रामगृह येथे दिनांक 24 रोजी शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्यांना भेट घेऊन मार्गदर्शन केले.

सदर लोहा विधानसभेचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी कार्यकर्त्यांना भेट देऊन मार्गदर्शन करण्यासाठी बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे आयोजन माननीय शंकर पाटील नागराळे यांनी केली. यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात मांजरा बचाव कृती समितीचे अध्यक्ष गंगाधर प्रंचड यांनी मांजरा बचाव व तेलंगणातील असलेल्या सुविधा यासह बाबळी बंधारा च्या पाण्याच्या विषयावर भाषण केले.
 शंकर अण्णा धोंडगे यांनी भारत राष्ट्र समिती राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री माननीय के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सुविधा व योजना बदल मार्गदर्शन करून लोह्याच्या सभेसाठी जायचं आहे असे सांगितले.
यावेळी चंद्रकांत लोखंडे ठिबक सिंचन चे व्यापारी तथा शेतकरी शंकर पाटील नागराळे, शेतकरी हाणमंत पाटील मिनके, राजु पाटील शिंपाळकर, प्रवीण सोनकांबळे, त्र्यंबक पाटील, मारुती शिरगिरे, शेख मुक्तीयार, मिलिंद पवार,लाखे सुलतानपूरकर, पत्रकार ए.जी कुरेशी, संजयकुमार पोवाडे, सय्यद रियाज, सुनिल जेठे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या