अलिबाग तालुक्यातील स्थानिकांच्या हाकेला सदैव धावून येणारा एकमेव आमदार महेंद्र शेठ दळवी !

[ अलिबाग प्रतिनिधी:- अभिप्राव पाटील ]
सर्वसामान्य जनतेचा नेहमी विचार करून येथील उद्योग व्यवसायात स्थानिक नागरिकांना प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे अशी कायम भूमिका असणारे अलिबाग-मुरुड चे कार्यसम्राट आमदार सन्मा.श्री.महेंद्रशेठ दळवी यांच्या विशेष पुढाकाराने व प्रयत्नाने काल महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा.ना.श्री.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल कंपनी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत गेल प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगार संघटना उसर यांच्याबाबतीत झालेल्या बैठकीत खालील बाबींबाबत ठराव मंजूर करण्यात आला व तसे आदेश उद्योग मंत्र्यांनी गेल कंपनी व एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले.

१. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पहिल्या टप्यात संपादित केल्या आहेत त्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा.
२. प्रकल्पग्रस्थाना शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरीत घ्यावे.
३.गेल कंपनीच्या आवारात ट्रेनिंग सेंटर उभारून प्रकल्पग्रस्त व स्थानिक तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ट्रेनिंग देऊन येणाऱ्या नवीन प्रकल्पात त्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे.
३.गेल कंपनीसाठी एमआयडीसी ची नवीन पाण्याची लाईन टाकण्यात येत आहे. या नवीन पाण्याच्या लाईन मधून खानाव व बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यात यावा.
तदप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. महेंद्र कल्याणकर, प्रांताधिकारी श्री. ढगे, एमआयडीसी सीईओ श्री.अलबनगण, गेल ओआयसी श्री. गुप्ता, एच आर मॅनेजर श्री. सक्सेना,कामगार नेते श्री. अनंत गोंधळी, शिवसेना जिल्हा खजिनदार श्री. सुरेश म्हात्रे, गेल प्रकल्पग्रस्त कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय सुतार, सचिव पांडुरंग मांडे, शशिकांत पाडेकर, सुशील पाटील, परशुराम कानप, मिलिंद कंटक, वृशिकेश कंटक आदी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या