[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
श्री. मारोतराव कवळे गुरुजी. उमरी तालुक्याला पडलेले एक गोमटे स्वप्न. विकासाचा जणु ध्यास घेतलेली एक मूर्ती. जिच्या रूपाने साध्या रोपटयापासून वट वृक्षात रूपांतर करणारा एक भूमिपुत्र. स्वप्न सारे खरे ठरतात किंवा असतात असे नाही. पण स्वप्नात सत्यात उतरवणारा एक सच्चा उद्योगी. या कर्तृल संपन्न व्यक्तिने आपल ठसा -उद्योग क्षेत्रात मिळविला की तो अमिट स्वरूपाचा आहे. साध्या दोन गायी पासून दूध संकलन करीत आपल्या दूरदृष्टीने,कष्टाने साईकृपा दूध डेरी स्थापन तर केलीच. व दुधापासून अन्य दूग्धजन्य पदार्थाची निर्मिती करून मा व्यवसामाला प्रतिष्ठा मिळवून दिली, उद्योगाची घरी । रिद्धी सिद्धी पाणी भरी ” असे म्हणतात. ते त्यांनी सिद्ध करून दाखवले. आणि शेतक-यांच्या खिशात दोन पैसे उसे मिळतील याकडे आपला कल पोहचविला. नंतर गुळाचा कारखाना,गुळ पावडर जे कि आरोग्याला खुप उपयुक्त असते याची निर्मिती केली. आज त्या गुळ पावडरची विक्री सातासमुद्रापलीकडे जाते आहे. असा हा दूरदृष्टीचा कष्टकरी, शेतकरी पुत्राचा वाढदिवस म्हणजे तमाम भूमिपुत्राचा व विकासात्मक दृष्टी असलेल्या युवकांचा वाढदिवस आहे असे आम्हास वाटते.

व्हीपीके बिगर शेतकरी पतपेढीच्या माध्यमातून लोकांना जशी बचतीची सवय लावली. तसेच त्याच्या हाताला काम मिळावे म्हणून नवउद्योग सुरू करण्याची प्रथा सुरु केली. अनेक लहान मोठे उद्योग करून व्यवसायिक होण्याचा प्रयत्न स्तुत्य असाच आहे. ती आता पतपेढी राहिली नाही तर ती शेतकयाच्या लघुउद्योगाची विश्वासार्हतेची बँक म्हणून नावारूपाला आली. केवळ उमरी तालुका मर्यादित क्षेत्र न ठेवता या पतपेढीच्या जिल्ह्यात आणि जिल्ह्या बाहेर शाखा उघडून लोकांना अडीअडचणीच्या काळात मदत करणारे एक केंद्र झाले आहे. याचा लाभ सर्वजण घेत आहेत हे पाहून नवल वाटायला नको. गुरुजी केवळ उद्योग क्षेञाकडेच वळतात असे नाही तर राजकारणात देखील त्यांचा वावर तितकाच आहे. वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करतात ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे आता विरोधकांनाही पटले आहे. त्यामुळे कुणाच्या मनात कसेही विचार येवोत. सामान्य, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांना गुरुजी आपले वाटतात. यातच सर्व काही आले एक उद्योग स्थापन करायचा म्हणजे त्यासाठी निधीची आवश्यकता असते आपल्या कुशल स्वभावाने तेही त्यांनी साध्य केले आहे. हे नव्याने सांगायला नको. मृदु स्वभाव, बोलणे कमी काम अधिक, इतरांचे भले करण्यात आपला वेळ खर्ची घालणारा भूकेची तमा न बाळगणारा, असा समोरच्या व्यक्तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आनंदी राहणारा असा भूमिपुत्र आज तरी तालुक्यात सोडा जिल्हयात शोधूनही सापडणार नाही.

राजकारण करत असताना तो या पक्षाचा, गटाचा असा भेदभाव माणसाकडे चुकुनी दिसणार नाही, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या काम न करता कसे काही मिळविता येईल याकडेन लोकांचा कल आहे. परंतु जनतेला हेच सांगावेसे वाटते की उशीम भलत्या सलत्या अपेक्षा ठेऊ नका.माग गुरुजी काय देतील याचा विचार न करता गुरुजीच्या उद्योग क्षेत्राशी निगडीत मला काय देता येईन याचा मनोमन विचार करा. तरच शेतक-याची ही कामधेनू निश्चितच फळ दिल्याशिवाय राहणार नाही, हाताला काम मिळाले की दाम आपोआपच पदरात पडत असते. ही चांगली उदात्त भावना मनात ठेऊन कार्याला लागा. गुरुजी समर्थ आहेत. याचा अर्थ गुरुजीना अडचणीत आणून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, तुम आगे बढ़ो म्हणत असताना हम साथ है म्हणा गुरुजी असे अनेक उद्योग उभारून या भागाला सुजम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाहीत. एक तळमळीचा कार्यकर्ता नेता म्हणून आज जी त्यांनी उंची गाठली आहे. तिला अबाधित ठेवण्याचे काम आपणास करायचे आहे. थांबला तो संपला धावत्यात शक्ती येई | आणि रस्ता सापडे. रस्ता दाखविण्याचे पुण्यकर्म गुरूजी करत आहेत. सहकारी संस्था मोडीत निघत असताना आपल्या कर्तृलावर विश्वास देवून मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन ते मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा श्वास आणि ध्यास एकच आहे. आपला आणूस आर्थिक दृष्ट्या प्रभळ व्हावा. त्यासाठी उद्योगाची कास धरावी. शेतकरी खूप कष्ट करतात. परंतु अस्मानी व सुल्तानी संकटाचा मुकाबला करण्यास तो हतबल होतो. निराशा टाकून सकारात्मकतेचा विचार करून एकादे कार्य केले तर निश्चित यश मिळते यावर गुरुजींचा विश्वास आहे. या विश्वासाच्या बळावर त्यांनी शून्यातून विश्व साकारण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कार्यास महाविकास आघाडीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या