स्व.आर.आर.पाटलाच्या विचार धारेवर वाटचाल करून राष्ट्रवादी संघटन वाढवा – हरिहर भोसीकर !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांची स्वच्छ निस्वार्थी प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे सहयाद्रीच्या उंचीचे खा. शरदचंद्रजी पवार विकासाभिमुख नेत्रत्व या सर्व राजकीय सामाजिक मूल्याचा विचार अंगीकृत करत गेल्या 20 वर्षांपूर्वी स्व. गंगाधररावजी कुंटुरकर, स्व. बापूसाहेब देशमुख गोरठेकर व डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्व.बाबासाहेब गोरठेकरांनी व बापूसाहेब गोरठेकर साहेबांनी या नायगाव विधानसभा मतदार संघात भरीव कामे केली पुढील काळात पक्षाची एकनिष्ठता संघटन वाढवून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत भरभरून यश पक्षाला प्राप्त करून दयावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी उमरी येथील पक्ष नोंदणी व तालूका आढावा बैठकीत उपस्थित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते मा.आ.कै. बापुसाहेब गोरठेकर यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी व राष्ट्रवादी युवक पदाधिकार्याची जम्बो भरती करण्यात आली.उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे उदघाटन व पक्ष नोंदणी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष ऍड . भाऊसाहेब देशमुख गोरठेकर हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख यांनी केले या प्रसंगी शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांनी पक्ष नोंदणी व राष्ट्रवादीचे संघटन वाढवून पुनश्च उमरी तालुका राष्ट्रवादीमय करू अशी ग्वाही अपल्या भाषणातून उपस्थितांना दिली , सुभाष देशमुख गोरठेकर,पांडुरंग गोरठेकर जिल्हा उपाध्यक्ष,सौ.प्रांजली रावनगावकर महिला जिल्हाध्यक्षा, धनंजय सूर्यवंशी युवक जिल्हाध्यक्ष , अजिंक्य राणा देशमुख विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष, नारायण येमेवार जिल्हा युवक उपाध्यक्ष, कैलाश पाटिल इज्जतगावकर,ज्ञानेश्वर पा.कदम युवक तालुकाध्यक्ष, शिवाजी पाटील कार्लेकर, शंकर पाटील बोळसेकर,रावसाहेब पाटिल कुदळेकर, साहेबराव पाटील पुयड,नारायणराव जिरोणेकर, मारोतराव पाटील मनुरकर, विरेंद्रसिंग चंदेल, शिवाजी पाटिल चिंचाळकर, पांडुरंग पाटील शाहीर जंटल सदानंद खांडरे नगराध्यक्ष प्रतिनिधी,आनंदराव येलमगोंडे जि. प.सदस्या प्रतिनिधी, गणेश अनेमवाड ओ. बी.सी.सेल तालुका अध्यक्ष, मोगल खयास बेग अल्पसंख्याक प्रदेश सदस्य,राजु पा.ढगे संचालक,धीरज दर्डा, अशोक मामीडवार,गजानन खांडरे, अनंत रॅपनवाड,हणमंत पा. कुदळेकर, अविनाश पाटिल पवळे,मुज्जमिल बेग,रमीज बेग,गंगाधर शिगळे, आनंदा रेड्डी ,तुकाराम पाटिल कवळे, यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश हैबते व जिगळेकर पा. यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या